ठाण्यात लाखो रुपयांचे तंबाखू आणि गुटखा पदार्थ पोलिसांनी जप्त केले

राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असताना देखील काही भागात गुटखा सर्रासपणे विक्री केला जातो. पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला पोलीस तंबाखू नियंत्रण पथकाने छापेमारी करत लाखो रुपयांचे गुटखा पदार्थ जप्त केले आहे.

पानटपरी वाले सर्रास पणे गुटखा विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावर राबोडी परिसरात क्रांतीनगर गल्लीत कारवाई करत लाखो रुपयांचे गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. 

विक्री करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कलम  26(2),27,26(2),(iv),30(2)(ए) प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक केली आहे. 

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे जीवघेणा आजार होतो. त्यामुळे राज्यात या पदार्थाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अन्नसुरक्षा व मानके, राबोडी पोलीस ठाणे पोलिस पथकाला क्रांतीनगर गल्ली, राबोडी येथे बेकायदेशीररीत्या तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाची विक्री सुरु असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस पथकांनी छापेमारी करत सहा लाखाचे गुटखा जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. 

 Edited by – Priya Dixit  

Go to Source