उत्तर प्रदेशात पोलीस भरती परीक्षा रद्द

वृत्तसंस्था/ लखनौ पोलीस भरती चाचणी परीक्षेची प्रश्नप्रत्रिका फुटल्याने ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. या परीक्षेची प्रश्नप्रत्रिका फुटल्याने राज्यात युवावर्गाने काही महिन्यांपूर्वी आंदोलन केले होते. या प्रश्नाची तीव्रता पाहून राज्य सरकारने अखेर परीक्षा नव्याने घेण्याचा निर्णय घोषित केला आहे. परीक्षांच्या पावित्र्याशी कोणत्याही परिस्थितीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तसेच प्रश्नपत्रिका फोडणाऱ्यांची […]

उत्तर प्रदेशात पोलीस भरती परीक्षा रद्द

वृत्तसंस्था/ लखनौ
पोलीस भरती चाचणी परीक्षेची प्रश्नप्रत्रिका फुटल्याने ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. या परीक्षेची प्रश्नप्रत्रिका फुटल्याने राज्यात युवावर्गाने काही महिन्यांपूर्वी आंदोलन केले होते. या प्रश्नाची तीव्रता पाहून राज्य सरकारने अखेर परीक्षा नव्याने घेण्याचा निर्णय घोषित केला आहे.
परीक्षांच्या पावित्र्याशी कोणत्याही परिस्थितीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तसेच प्रश्नपत्रिका फोडणाऱ्यांची गयही केली जाणार नाही. या प्रकरणी राज्य सरकार अत्यंत गंभीरपणे कारवाई करत असून लवकरच गुन्हाही दाखल करण्यात येईल. नवी परीक्षा येत्या सहा महिन्यांमध्ये घेण्यात येईल. नवी परीक्षा घेताना कोणताही गडबड घोटाळा होणार नाही, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी सरकारच्या निर्णयाची माहिती देताना केले. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक युवक आणि विद्यार्थी संघटनांनीही समाधान व्यक्त केले असून यापुढच्या परीक्षांमध्ये सरकार भ्रष्टाचार होणार नाही याची दक्षता घेईल, अशी अपेक्षा अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.