जळगावमध्ये घरगुती गॅस भरणाऱ्या वाहनांवर छापा, ३ जणांना अटक

महाराष्ट्रातील जळगावमधील असोदा रोडवरील मोहन टॉकीज परिसरात असलेल्या खाजगी वाहनांच्या गॅस भरण्याच्या केंद्रावर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकला आणि तीन संशयितांवर कारवाई केली.

ALSO READ: महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का देत माजी मुख्यमंत्र्यांच्या सून कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल

मिळालेल्या महितीनुसार या कारवाईत पोलिसांनी एकूण ६१ घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर जप्त केले आहे. मोहन टॉकीज परिसरात वाहनांमध्ये घरगुती गॅस बेकायदेशीरपणे भरला जात असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी त्यांच्या पथकासह छापा टाकला. कारवाईदरम्यान ३३ घरगुती आणि २८ व्यावसायिक गॅस सिलिंडर, एक वजन यंत्र आणि सिलिंडर वाहतूक करण्यासाठी वापरले जाणारे वाहन जप्त करण्यात आले आहे.

ALSO READ: नागपुरात भाजप कार्यकर्त्याची हत्या; पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: ठाण्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांना डेंग्यू झाल्याने शाळा बंद, ऑनलाइन अभ्यास केला जाणार

Go to Source