एक लाख रुपयाच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकाच्या आवाजाची पडताळणी

बेळगाव : एक लाख रुपयाची लाच मागितल्याच्या आरोपावरून अथणीचे पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर यांच्यावर लोकायुक्त पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली असून पोलीस निरीक्षकाच्या आवाजाचे नमुने जमविले आहेत. घी गल्ली, बेळगाव येथील मीरासाब अब्दुलमजीद मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 7 नोव्हेंबर रोजी लोकायुक्त पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. […]

एक लाख रुपयाच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकाच्या आवाजाची पडताळणी

बेळगाव : एक लाख रुपयाची लाच मागितल्याच्या आरोपावरून अथणीचे पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर यांच्यावर लोकायुक्त पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली असून पोलीस निरीक्षकाच्या आवाजाचे नमुने जमविले आहेत. घी गल्ली, बेळगाव येथील मीरासाब अब्दुलमजीद मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 7 नोव्हेंबर रोजी लोकायुक्त पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. पोलीसप्रमुख हनुमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक भरतरेड्डी एस. आर., पोलीस निरीक्षक वेंकटेश यडहळ्ळी व त्यांचे सहकारी या प्रकरणी तपास करीत आहेत.
पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर व मीरासाब यांच्यात झालेल्या संभाषणाचा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. अथणी येथे 30×40 चे दोन भूखंड घेण्यासाठी अथणी येथील अनुपकुमार नायर यांना त्यांनी 20 लाख रुपये दिले होते. भूखंड किंवा दिलेले पैसेही परत मिळाले नाहीत म्हणून मीरासाब यांनी यासंबंधी जिल्हा पोलीसप्रमुखांकडे तक्रार केली होती. पोलीसप्रमुखांनी हा अर्ज चौकशीसाठी अथणी पोलीस स्थानकाला पाठवला होता. या प्रकरणी मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी एक लाखाची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.