हुबळीत दोन आरोपींवर पोलिसांकडून गोळीबार
बेंगळूर : पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींच्या पायावर पोलिसांनी गोळीबार केला आहे. आरोपी बलराज आणि मोहम्मद शेख यांच्या पायाला गोळ्या लागल्या आहेत. रविवारी सकाळी हुबळी शहरातील मंटूर रोडवर ही घटना घडली. इन्स्पेक्टर एस. आर. नायक यांनी दोघांवरही गोळीबार केला. मल्लिकजान यांच्या खून प्रकरणातील आरोपी बलराज आणि शेख यांनी पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्नात होते. दरम्यान, इन्स्पेक्टर एस. आर. नायक यांनी त्यांच्या पायावर गोळीबार केला. हे दोघेही आरोपी श्याम जाधव टोळीतील आहेत. या घटनेत इन्स्पेक्टर एस. आर. नायक, हवालदार अहमद निलगर आणि चलवादी यांच्यासह तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलीस आणि आरोपींना उपचारासाठी किम्स ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.
Home महत्वाची बातमी हुबळीत दोन आरोपींवर पोलिसांकडून गोळीबार
हुबळीत दोन आरोपींवर पोलिसांकडून गोळीबार
बेंगळूर : पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींच्या पायावर पोलिसांनी गोळीबार केला आहे. आरोपी बलराज आणि मोहम्मद शेख यांच्या पायाला गोळ्या लागल्या आहेत. रविवारी सकाळी हुबळी शहरातील मंटूर रोडवर ही घटना घडली. इन्स्पेक्टर एस. आर. नायक यांनी दोघांवरही गोळीबार केला. मल्लिकजान यांच्या खून प्रकरणातील आरोपी बलराज आणि शेख यांनी पोलिसांवर हल्ला करून […]
