मनोज जरांगेच्या उपोषणाला पोलिसांनी नाकारली परवानगी,ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन केले आणि मराठा समाजाची ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी तसेच सगे सोयरे कायदा लागू करण्याची मागणी घेत पुन्हा उपोषण करण्याची घोषणा केली.येत्या शनिवारी ते आंतरवली सराटी येथे उपोषणाला बसणार होते.

 या उपोषणाची आंतरवली सराटी ग्रामस्थांचा विरोध होता. ग्रामस्थांनी चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. आंदोलनामुळे गावातील जातीय सलोखा बिघडण्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्यामुळे मनोज जरांगे पाटीलांना उपोषणासाठी परवानगी देऊ नये अशी विनंती केली होती. आता पोलिसांनी या उपोषणाला परवानगी नाकारली आहे. 

या उपोषणामुळे गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. तसेच शाळा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडू शकतो. महिलांना विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो त्यामुळे या उपोषणाला परवानगी देऊ नये असे ग्रामस्थांचे म्हणणे असे. या लेखी निवेदनावर ग्रामस्थांची सही देखील आहे. 

तसेच मनोज जरांगे यांच्या कडून ग्रामसभेची कोणतीही कागदपत्रे सादर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या शनिवारी होणाऱ्या उपोषणाला परवानगी दिली नाही. आता यावर मनोज जरांगे काय पाऊल घेतात या कडे लक्ष लागले आहे. 

Edited by – Priya Dixit   

Go to Source