नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत पोलिसांची बॉर्डर परिषद

सावंतवाडी । प्रतिनिधी (संतोष सावंत ) महाराष्ट्रात होत असलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आज गोवा आणि महाराष्ट्राच्या पोलीस अधिकाऱ्यांची येथील पर्णकुटी विश्रामगृह येथे सावंतवाडी पोलिसांची बॉर्डर परिषद संपन्न झाली.या बैठकीत गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुन्हेगारी तसेच अवैध धंदे रोखण्यासाठी कशी दक्षता घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन व टिप्स […]

नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत पोलिसांची बॉर्डर परिषद

सावंतवाडी । प्रतिनिधी (संतोष सावंत )
महाराष्ट्रात होत असलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आज गोवा आणि महाराष्ट्राच्या पोलीस अधिकाऱ्यांची येथील पर्णकुटी विश्रामगृह येथे सावंतवाडी पोलिसांची बॉर्डर परिषद संपन्न झाली.या बैठकीत गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुन्हेगारी तसेच अवैध धंदे रोखण्यासाठी कशी दक्षता घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन व टिप्स देण्यात आल्या. महाराष्ट्रातील आणि गोव्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने दोन्ही राज्य पोलिसांमध्ये कारवाई व आरोपी देवाण-घेवाण, पोलीस मदत, बॉर्डर चेक पोस्टवर परस्पर सहकार्याबाबत या अनुषंगाने समन्वय साधण्याकरिता सदर बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकडॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, नॉर्थ गोवा पोलीस अधीक्षक श्री राहुल गुप्ता, बिचोली प्रभारी पोलीस उपअधीक्षक श्रीमती श्रीदेवी , आयपीएस अधिकारी त्याचप्रमाणे गोवा व सिंधुदुर्गातील एकूण ४ पोलीस उपअधीक्षक ८ पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते.