उमेदवारी न मिळाल्याने खासदाराचे विषप्राशन

वृत्तसंस्था/ कोईम्बतूर तामिळनाडूतील एमडीएमके खासदार गणेशमूर्ती यांना रविवारी रात्री गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी किटकनाशक सेवन केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने खासदार ए गणेशमूर्ती यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा कुटुंबीयांच्या हवाल्याने केला जात आहे. मात्र, याबाबत डॉक्टरांना विचारणा केली असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. 2019 […]

उमेदवारी न मिळाल्याने खासदाराचे विषप्राशन

वृत्तसंस्था/ कोईम्बतूर
तामिळनाडूतील एमडीएमके खासदार गणेशमूर्ती यांना रविवारी रात्री गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी किटकनाशक सेवन केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने खासदार ए गणेशमूर्ती यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा कुटुंबीयांच्या हवाल्याने केला जात आहे. मात्र, याबाबत डॉक्टरांना विचारणा केली असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.
2019 च्या निवडणुकीत तामिळनाडूच्या इरोड लोकसभा मतदारसंघातून गणेशमूर्ती हे खासदार झाले होते. त्यांची तब्येत बिघडल्याने कुटुंबीयांनी रविवारी रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये हलवले असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सध्या कोईम्बतूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ताज्या माहितीनुसार खासदार गणेशमूर्ती यांच्या प्रकृतीत सध्या सुधारणा होताना दिसत आहे.
खासदार गणेशमूर्ती यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक नेते त्यांना कोईम्बतूर येथील खासगी रुग्णालयात भेटण्यासाठी आले. यामध्ये द्रमुक नेते एस मुथुसामी, राज्याचे शहर विकास, गृहनिर्माण आणि उत्पादन शुल्क मंत्री डॉ सी. सरस्वती, मोदाकुरिचीचे भाजप आमदार, एआयएडीएमके नेते के. व्ही. रामलिंगम आणि इतर काहीजण ऊग्णालयात पोहोचले. त्यांनी गणेशमूर्तींच्या प्रकृतीची विचारपूस करत कुटुंबीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.