मुस्लिम आरक्षणला घेऊन पीएम मोदींचे वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्य्यात मतदान पूर्वी मुस्लिम आरक्षणावर मोठा मुद्दा मांडला आहे. ते म्हणाले की, मुस्लिमांना धर्म आधारित आरक्षण मिळणार नाही. एक अर्वजनिक रॅलीला संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर वोट बँकेच्या राजकारणात सहभागी होण्याचा आरोप लावत म्हणाले की, त्यांना अन्य धर्मांची काळजी नाही. त्यांनी काँग्रेसच्या नैतृत्व असलेल्या सरकारवर मुसलमानांना धर्माच्या आधारावर आरक्षण देणे आणि वंचित जातींना आरक्षण कमी करण्याचा आरोप लावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एकद परत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेल्या राज्य सरकारवर धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा आरोप लावला आहे. ते म्हणाले की, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, ओबीसी आणि अन्य वनचीत जाती समूह यांना मिळणाऱ्या आरक्षणला धर्माच्या आधारावर मुसलमांनाना देऊ देणार नाही. मोदीजींनी एक सार्वजनिक रॅलीला संबोधित करत हे वक्तव्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाले की, ‘ते संविधानाच्या नावावर देशाला मूर्ख बनवण्यासाठी निघाले आहे’. हे लोक सांसदच्या कार्यवाहीला थांबवतात. तसेच हे निवडणूक आयोगावर प्रश्न निर्माण करतात. आता हे आपले मत बँकेसाठी संविधानला बदनाम करण्यासाठी निघाले आहे. पण काँग्रेसने ऐकून घ्यावे, “जोपर्यंत मोदी जिवंत आहे मी दलितांचा, एससी, एसटी, ओबीसीचे आरक्षण धर्माच्या आधारावर मुस्लिमांना देऊ देणार नाही”.
यापूर्वी देखील मोदीजी म्हणाले होते की, काँग्रेसच्या नैतृत्वखाली असलेली सरकारवर मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण देणे आणि वंचित जातींचे आरक्षण कमी करण्याचा आरोप लावला होता. त्यांनी मुस्लिम समुदायाला ओबीसी यादीमध्ये सहभागी करून कर्नाटक सरकारच्या निर्णयाची आलोचना केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसवर मतबँकेची राजनीतीमध्ये सहभागी होण्याचा आरोप लावत म्हणाले की, त्याला इतर धर्माची काळजी नाही. तसेच ते म्हणाले की, ‘हैद्राबादमध्ये रामनवमी मिरवणुकीवर देखील प्रतिबंध लावला जात आहे. ज्यामुळे मतबँक नाराज व्हायला नको.
तसेच, जहिराबादच्या रॅली मध्ये मोदीजी म्हणाले की, ‘जेव्हा पूर्ण दुनिया प्रगती करत होती, तेव्हा भारताला काँग्रेसने भ्रष्टाचाराच्या बेडीमध्ये बांधून ठेवले होते. दुनिया आर्थिक प्रगती करीत होती, पण भारत पॉलिसी पॅरालिसीसचा शिकार होता. एनडीए ने खूप मेहनतीने भारताला त्या अडचणीतून बाहेर काढले आहे. परंतु काँग्रेस देशाला त्याच पूर्वीच्या दिवसांमध्ये घेऊन जाऊ इच्छित आहे.
Edited By- Dhanashri Naik