पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतील. 8 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 3 वाजता ते नवी मुंबई येथे दाखल होतील. नव्याने बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा घेतील. त्यानंतर सुमारे 3:30 वाजता पंतप्रधान NMIA चे उद्घाटन करतील. तसेच मुंबईतील विविध प्रकल्पांचे लोकार्पण व शुभारंभ करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.9 ऑक्टोबरला पंतप्रधानांचा कार्यक्रम:सकाळी सुमारे 10 वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत युनायटेड किंगडमचे पंतप्रधान सर कीयर स्टार्मर यांचे स्वागत करतील. सुमारे 1:40 वाजता, दोन्ही देशांचे पंतप्रधान Jio World Center येथे होणाऱ्या CEO फोरम मध्ये सहभागी होतील. त्यानंतर सुमारे 2:45 वाजता, दोघेही 6व्या ग्लोबल फिनटेक फेस्ट मध्ये सहभागी होतील आणि भाषण करतील. मुंबई मेट्रो लाईन ३ (अक्वा लाईन):पंतप्रधान मुंबई मेट्रो लाईन 3च्या फेज 2बी (आचार्य अत्रे चौक ते कुलाबा) चे उद्घाटन करतील, जो सुमारे 12,200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. यासह, पूर्ण मेट्रो लाईन 3 (33.5 किमी, 27 स्थानके) राष्ट्राला समर्पित केली जाईल. हा संपूर्ण प्रकल्प 37,270 कोटी रुपये खर्चून पूर्ण झाला आहे.मुंबईतील पहिली आणि एकमेव पूर्णतः भूमिगत मेट्रो लाईन, मुंबईतील प्रवास पद्धतीत क्रांती घडवून आणेल. ही मेट्रो लाईन दररोज सुमारे 13 लाख प्रवासी वाहून नेईल. तसेच फोर्ट, कला घोडा, मरीन ड्राइव्ह, बॉम्बे हायकोर्ट, मंत्रालय, रिझर्व बँक, BSE, नरिमन पॉइंट यांसारख्या ठिकाणांना थेट जोडेल.मुंबई वन (Mumbai One) – एकत्रित मोबिलिटी अॅप:पंतप्रधान Mumbai One नावाचे एकत्रित मोबिलिटी अॅप लाँच करतील. हे अॅप 11 सार्वजनिक वाहतूक सेवा (PTOs) ना एकत्र आणते. मुंबई मेट्रो लाईन 2A, 7, 3 आणि 1मुंबई मोनोरेलनवी मुंबई मेट्रोमुंबई उपनगरी रेल्वेBESTठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिका परिवहनMumbai One अॅप मधून प्रवाशांना खालील सुविधा मिळतील:सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी एकाच अॅपवरून मोबाईल तिकिटिंगडिजिटल व्यवहारामुळे रांगा टाळता येतीलएकाच तिकिटात मल्टी-मोडल प्रवास शक्यथेट अपडेट्स – उशीर, पर्यायी मार्ग, आगमन वेळनकाशावर आधारित माहिती – जवळची स्टेशनं, आकर्षणस्थळंSOS फिचर – प्रवाशांच्या सुरक्षेसाठीहे सर्व पर्याय एकत्रितपणे मुंबईतील प्रवाशांचा अनुभव अधिक सुविधाजनक, कार्यक्षम आणि सुरक्षित बनवतील.हेही वाचानवी मुंबई ते नांदेड विमानसेवेची मागणी
दिवाळीनिमित्त एसटीचा पर्यटन पास झाला स्वस्त
पंतप्रधान ‘मुंबई वन’ अॅप लाँच करणार