इंद्रियांनी सुचवलेली सुखे माणसाचा सर्वनाश करतात
अध्याय पहिला
आजकाल प्रत्येकजण मन:शांती मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. अमुक अमुक केले की, शांती मिळेल असे सांगणारेही खूप जण आहेत व त्याप्रमाणे वागणारेही बरेच आहेत. कुणी योगासने करायला सुचवते, कुणी धार्मिक कर्मकांडे करायचा सल्ला देते तर कुणी धर्मग्रंथ वाचा, दानधर्म करा म्हणून सांगते. पण ही सगळी वरवरची मलमपट्टी असते. अशा उपायांनी काहीकाळ मन शांत असते. कायमची मन:शांती मिळवायची असेल तर चित्तात समाधान विलसत असायला पाहिजे आणि त्यासाठी इच्छा अपेक्षा ठेवणे विसरायला हवे. म्हणजे त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून मन अस्वस्थ होणार नाही. सदैव मन:शांती मिळवण्यासाठी जीवनात जे वाट्याला येईल ते स्वीकारण्याची तयारी ठेवली की, बुद्धी स्थिर होईल, सर्वांच्याविषयी सद्भावना निर्माण होईल आणि मन सदैव प्रसन्न राहील. माणसाचे मन प्रसन्न असले की त्याला शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभते. त्यामुळे तो शांतीरूप होतो. ह्या बाप्पांच्या सांगण्याची पुष्टी भगवान श्रीकृष्ण गीतेतही करतात. ते म्हणतात,
प्रसन्नतेपुढे सर्व दु:खे जाती झडूनिया । प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे । 2.65 ।
इंद्रिये ज्याच्या ताब्यात नसतात तो इंद्रियांनी सुचवलेल्या गोष्टींच्या मागे धावून त्यांच्या प्राप्तीतून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो पण दरवेळी त्या वस्तू मिळतातच असे नाही. त्यामुळे अतृप्तीत वाढ होते. समजा इच्छिलेल्या वस्तू मिळाल्या तरी त्या आणखी मिळाव्यात म्हणून प्रयत्न सुरू होतात आणि ह्या सगळ्याचा शेवट अतृप्तीत होतो. अतृप्ततेमुळे माणसाच्या मन:शांतीत बिघाड होतो असे बाप्पा पुढील श्लोकात सांगतायत,
इन्द्रियाश्वान्वचिरतो विषयाननु वर्तते ।
यन्मनस्तन्मतिं हन्यादप्सु नावं मऊद्यथा ।।64।।
अर्थ-विषयांमध्ये संचार करणाऱ्या इंद्रियरूपी अश्वांना अनुसरून जे मन चालते ते मन पाण्यामध्ये संचार करणाऱ्या नावेला जसा वायू नष्ट करतो त्याप्रमाणे-बुद्धीचा नाश करते.
विवरण – माणसाच्या दु:खांचे मूळ कारण हव्यास हे आहे. इंद्रियांनी सुचवलेल्या गोष्टीच्या उपभोगातून सुख मिळते, आनंद मिळतो आणि तो सतत मिळावा हा हव्यास किंवा हावरटपणा माणसाचा घात करतो. बाप्पा म्हणतात, ज्याच्या जीवनाच्या रथाचे इंद्रियऊपी घोडे सुखाच्या हव्यासापायी उधळलेले आहेत त्याचा, वादळात भरकटून दिशाहीन झालेल्या होडी ज्याप्रमाणे खडकावर आपटून नाश पावते त्याप्रमाणे नाश होतो. ही गोष्ट बाप्पा आपल्याला रथ आणि घोड्यांच्या उदाहरणातून पटवून देतात. ते म्हणतात, वास्तविक पाहता जो रथ चालवत असतो त्याच्या ताब्यात घोड्याचे लगाम असतात. लगामाचा उपयोग करून तो घोड्यांना योग्य मार्गाने नेऊन रथ इच्छित स्थळी पोहोचवतो पण जर ते घोडे उधळले तर सारथ्याचा घोड्यावरील ताबा सुटून रथ ख•dयात जातो. येथे दिलेले रथ आणि घोड्याचे उदाहरण कठोपनिषदातून घेतलेले आहे. आपले मन हे सारथी असते. मनात ज्या ज्या कल्पना येतात त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या शरीरातील आत्मा आपल्या अवयवात सुसूत्रता आणून आणि त्यासाठी आवश्यक ती उर्जा पुरवून त्यांच्याकडून ती कामे करून घेत असतो. आपले मन इंद्रियांनी सुचवलेल्या गोष्टी योग्य आहेत की अयोग्य आहेत हे बुद्धीचा उपयोग करून ठरवू शकते. अयोग्य गोष्टी टाळू शकते परंतु त्यासाठी मनाचा इंद्रियांवर ताबा हवा तो तसा नसेल तर बुद्धीचे न ऐकता ते इंद्रियांच्या आहारी जाते आणि त्यांनी सुचवलेल्या गोष्टीच्या मोहात पडून त्या मिळवण्यासाठी करू नये त्या गोष्टी सहजी करू लागते. म्हणून इंद्रियांनी सुचवलेल्या सुखांच्या मागे लागलेला मनुष्य अविवेकी निर्णय घेऊन स्वत:चा सर्वनाश करून घेतो.
क्रमश:
Home महत्वाची बातमी इंद्रियांनी सुचवलेली सुखे माणसाचा सर्वनाश करतात
इंद्रियांनी सुचवलेली सुखे माणसाचा सर्वनाश करतात
अध्याय पहिला आजकाल प्रत्येकजण मन:शांती मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. अमुक अमुक केले की, शांती मिळेल असे सांगणारेही खूप जण आहेत व त्याप्रमाणे वागणारेही बरेच आहेत. कुणी योगासने करायला सुचवते, कुणी धार्मिक कर्मकांडे करायचा सल्ला देते तर कुणी धर्मग्रंथ वाचा, दानधर्म करा म्हणून सांगते. पण ही सगळी वरवरची मलमपट्टी असते. अशा उपायांनी काहीकाळ मन शांत असते. कायमची […]