कसोटी खेळा, पैसे जादा कमवा : जय शहा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) कसोटी क्रिकेटला अधिक प्राधान्य देण्याची योजना आखली आहे. दरम्यान क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेट अधिक खेळावे आणि जादा कमाई करावी, असा कानमंत्र बीसीसीआयने दिला आहे. बीसीसीआयने कसोटी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या सामना मानधन रकमेमध्ये तिप्पट वाढ करण्याचे ठरविले आहे. कसोटी क्रिकेटला अधिक प्राधान्य मिळावे या हेतूने हा निर्णय घेण्यात आला […]

कसोटी खेळा, पैसे जादा कमवा : जय शहा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) कसोटी क्रिकेटला अधिक प्राधान्य देण्याची योजना आखली आहे. दरम्यान क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेट अधिक खेळावे आणि जादा कमाई करावी, असा कानमंत्र बीसीसीआयने दिला आहे.
बीसीसीआयने कसोटी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या सामना मानधन रकमेमध्ये तिप्पट वाढ करण्याचे ठरविले आहे. कसोटी क्रिकेटला अधिक प्राधान्य मिळावे या हेतूने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितले. सध्या कसोटी क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूला प्रत्येक सामन्यासाठी 15 लाख रुपयांचे मानधन दिले जात असे. आता हे सामना मानधन 45 लाख रुपये करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये 10 कसोटी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूला आता 4.50 कोटी रुपये मिळतील. याशिवाय त्याला बीसीसीआयने केलेल्या मध्यवर्ती कराराची रक्कम वेगळी दिली जाईल. 2022-23 च्या क्रिकेट हंगामामध्ये खेळाडूंना इतर भत्तेही देण्यात येणार आहेत.
इशान किसन, श्रेयस अय्यर आणि दीपक चहर यांनी रणजी क्रिकेट स्पर्धेत न खेळताना आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील संघांच्या सरावामध्ये सहभागी होणे पसंत केल्याने बीसीसीआयने कसोटी क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या भारतीय कसोटी संघातील अंतिम अकरा खेळाडूत निवडलेल्या प्रत्येक क्रिकेटपटूला 15 लाख रुपये तर राखीव खेळाडूला 7.50 लाख रुपये मानधन मिळते. प्रत्येक वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये क्रिकेटपटूला शक्यतो 4 ते 9 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे त्याला प्रत्येक सामन्यासाठी 45 लाख रुपये तर राखीव खेळाडूला 22.5 लाख रुपये मिळणार आहेत.