विमान कोसळून दोघे पायलट जखमी
विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वरजवळ दुर्घटना : कारण अस्पष्ट
वार्ताहर/विजापूर
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची धक्कादायक बातमी चर्चेत असतानाच विजापूर जिह्यात एक हलके प्रशिक्षण विमान कोसळल्याची घटना रविवारी दुपारी 2.30 च्या दरम्यान घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विजापूर जिह्यातील बबलेश्वरजवळ असलेल्या मंगळुरू गावात हे प्रशिक्षण विमान इंधन संपल्यामुळे किंवा अन्य तांत्रिक बिघाडामुळे जमिनीवर कोसळल्याची माहिती आहे. विमानात प्रशिक्षण देणारे साहाय्यक फ्लाइट इन्स्ट्रक्टर कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक गौतम हे जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारांसाठी विजापूर येथील बीएलडीई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैमानिक प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या रेड बर्ड एव्हिएशन संस्थेचे ‘सेस्ना 172 टँगो चार्ली’ हे विमान कलबुर्गीहून बेळगावकडे जात असताना बबलेश्वरजवळील मंगळूरू गावात कोसळले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींच्या मदतीस धाव घेतली. त्यांना त्वरित रुग्णवाहिकेद्वारे विजापूर रुग्णालयात नेऊन उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनास्थळी जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी भेट देऊन पाहणी केली.
Home महत्वाची बातमी विमान कोसळून दोघे पायलट जखमी
विमान कोसळून दोघे पायलट जखमी
विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वरजवळ दुर्घटना : कारण अस्पष्ट वार्ताहर/विजापूर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची धक्कादायक बातमी चर्चेत असतानाच विजापूर जिह्यात एक हलके प्रशिक्षण विमान कोसळल्याची घटना रविवारी दुपारी 2.30 च्या दरम्यान घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विजापूर जिह्यातील बबलेश्वरजवळ असलेल्या मंगळुरू गावात हे प्रशिक्षण विमान इंधन संपल्यामुळे किंवा अन्य तांत्रिक बिघाडामुळे जमिनीवर कोसळल्याची माहिती आहे. […]
