भाषिक दुराभिमान्यांकडून दुकानांवरील फलक लक्ष्य
मराठीतील नामफलक झाकण्यासाठी दादागिरी : व्यापाऱ्यांमध्ये नाराजी
बेळगाव : दुकाने तसेच आस्थापनांवरील मराठी फलकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न काही कन्नड दुराभिमानी संघटनांनी चालविला आहे. मराठी भाषिक फलक असलेल्या दुकानांच्या मालकांना धमकावले जात असून कन्नडमध्ये मोठ्या अक्षरात नामफलक लावण्यासाठी दादागिरी केली जात आहे. यामुळे मराठी भाषिक व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. बेळगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून यामुळे अनेक नामवंत ब्रँड आपली उत्पादने घेऊन बेळगावमध्ये येत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर या परिसरातील मोठ्या कंपन्या आपली उत्पादने विक्रीसाठी बेळगावमध्ये फ्रँचायजी उघडत आहेत. यावेळी कन्नडसोबत मराठी व इंग्रजीलाही नामफलकामध्ये स्थान दिले जात आहे. परंतु, नेहमीच मराठी दु:स्वास करणाऱ्या काही कन्नड संघटनांकडून या नामफलकांना विरोध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी उद्यमबाग येथील ब्रह्मनगर येथे अशीच घटना घडली असून एका मराठी आस्थापनाला मराठीतून फलक लावल्याबद्दल दादागिरी करण्यात आली. तसेच मराठीतून लावलेला फलक झाकून त्याठिकाणी कन्नडमध्ये फलक लावण्यासाठी दबाव आणला जात होता. एकीकडे बेळगावमध्ये नवीन उद्योग, व्यवसाय येत नसल्याची तक्रार होत असताना अशा गळचेपीमुळे नवीन उद्योग बेळगावमध्ये येणार कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उद्योग-व्यवसायांनाही भाषिक रंग
बेळगावमध्ये 70 टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक असल्याने बरेच दुकानदार इंग्रजी, कन्नडसह मराठीलाही आपल्या दुकानांच्या नामफलकावर प्राधान्य देतात. तसेच बेळगावमध्ये खरेदीला येणारे अधिकतर ग्राहक हे गोवा, चंदगड व कोकणातून येत असल्याने व्यापाऱ्यांना मराठीशिवाय पर्याय नसतो. परंतु, नेहमीच मराठी खुपणाऱ्या काही संघटनांकडून उद्योग-व्यवसायांनाही भाषिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अशा प्रकारांना प्रशासनाने वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.
Home महत्वाची बातमी भाषिक दुराभिमान्यांकडून दुकानांवरील फलक लक्ष्य
भाषिक दुराभिमान्यांकडून दुकानांवरील फलक लक्ष्य
मराठीतील नामफलक झाकण्यासाठी दादागिरी : व्यापाऱ्यांमध्ये नाराजी बेळगाव : दुकाने तसेच आस्थापनांवरील मराठी फलकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न काही कन्नड दुराभिमानी संघटनांनी चालविला आहे. मराठी भाषिक फलक असलेल्या दुकानांच्या मालकांना धमकावले जात असून कन्नडमध्ये मोठ्या अक्षरात नामफलक लावण्यासाठी दादागिरी केली जात आहे. यामुळे मराठी भाषिक व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. बेळगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत […]