श्राद्ध पक्षात बनवले जाणारे भरड्याचे वडे, जाणून घ्या रेसिपी

श्राद्ध पक्षात सात्विक पदार्थ बनवले जातात, आणि भरड्याचे वडे हा एक पारंपरिक, सात्विक आणि चवदार पदार्थ आहे जो या काळात बनवला जाऊ शकतो.

श्राद्ध पक्षात बनवले जाणारे भरड्याचे वडे, जाणून घ्या रेसिपी

श्राद्ध पक्षात सात्विक पदार्थ बनवले जातात, आणि भरड्याचे वडे हा एक पारंपरिक, सात्विक आणि चवदार पदार्थ आहे जो या काळात बनवला जाऊ शकतो. 

साहित्य- 

दोन वाटी- जाड तांदूळ

एक  वाटी- उडदाची डाळ

एक वाटी- हरभर्‍याची डाळ

मीठ

तिखट

हळद

मिरची पेस्ट

तेल 

पाणी 

ALSO READ: श्राद्ध पक्षाच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश असतो? कोणते पदार्थ आवर्जून असावेत?

कृती-

सर्वात आधी उडदाची डाळ, हरभरा डाळ आणि तांदूळ या डाळी भाजून गिरणीतून भरडा काढावा. आता एका भांड्यात हे पीठ घेऊन आता या पिठात मीठ, तिखट, हळद, आवडीप्रमाणे वाटलेली मिरची पेस्ट आणि गरम तेलाचं मोहन घालून कोमट पाण्याने पीठ भिजवावं. आता हे मिश्रण प्लास्टिकवर थापून वडे बनवावे मध्यभागी भोक पाडून खरपूस तळून घ्यावे. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: श्राद्ध पक्षात बनवा तांदळाची खीर रेसिपी

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: श्राद्ध पक्षात बनवली जाणारी भोपळ्याची भाजी