पिटबुलचा ६ वर्षांच्या मुलावर हल्ला; चावा घेतल्याने कान वेगळा झाला

दिल्लीतील प्रेम नगर येथे एका भयानक घटनेत, पिटबुलने ६ वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलाचा एक कान गेला. त्याच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि शरीराला खोल जखमा झाल्या. ही घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे. तेव्हापासून लोकांमध्ये भीतीचे …

पिटबुलचा ६ वर्षांच्या मुलावर हल्ला; चावा घेतल्याने कान वेगळा झाला

दिल्लीतील प्रेम नगर येथे एका भयानक घटनेत, पिटबुलने ६ वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलाचा एक कान गेला. त्याच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि शरीराला खोल जखमा झाल्या. ही घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे. तेव्हापासून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. देवांश रस्त्यावर त्याच्या भावासोबत बॉल खेळत असताना अचानक एक पिटबुल आला आणि त्याच्यावर हल्ला केला.

 

Pitbull attacks 6-year-old in Delhi’s Prem Nagar, bites off the child’s ear. The owner of the dog has been arrested.

The incident took place on Sunday evening, when the child was playing outside his house. pic.twitter.com/jl1LKmndY8
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) November 24, 2025
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पिटबुल मुलाकडे धावत असल्याचे दिसून आले आहे. एक महिला त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण ती थांबवू शकत नाही. मुलगा धावतो, पण पिटबुल त्याला खाली पाडतो आणि त्याला जोरदार चावतो. पिटबुल मुलाचा उजवा कान चावतो. त्यानंतर दुसरा एक व्यक्ती धावत येतो आणि महिलेच्या मदतीने मुलाला कुत्र्यापासून वाचवण्यात यशस्वी होतो.

ALSO READ: Heavy rain warning २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

या प्रकरणाप्रकरणी पोलिसांनी पिटबुलचा मालक राजेश पाल (५०) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध कलम २९१ (प्राण्यांकडे दुर्लक्ष करणे) आणि १२५(ब) (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे निष्काळजी कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ALSO READ: ठाण्यात उड्डाणपुलाखाली सुटकेसमध्ये महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला
Edited By- Dhanashri Naik

Go to Source