व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची पीजीसीईटी परीक्षा जुलैमध्ये

27 मे ते 17 जूनपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत बेळगाव : एमबीए, एमसीए, एमई, एमटेक, एमआर्क यासह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी पीजीसीईटी-2024 परीक्षा यावर्षी 13 व 14 जुलै रोजी होणार आहे. कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने नुकत्याच एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यामुळे या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेची तयारी करावी […]

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची पीजीसीईटी परीक्षा जुलैमध्ये

27 मे ते 17 जूनपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत
बेळगाव : एमबीए, एमसीए, एमई, एमटेक, एमआर्क यासह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी पीजीसीईटी-2024 परीक्षा यावर्षी 13 व 14 जुलै रोजी होणार आहे. कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने नुकत्याच एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यामुळे या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील तसेच राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी 27 मे ते 17 जून या दरम्यान ऑनलाईन अर्ज दाखल करावयाचे आहेत. केईएच्या वेबसाईटवर जाऊन परीक्षार्थींना अर्ज दाखल करता येणार आहे. उच्चशिक्षणासाठी इतर राज्यातून कर्नाटकात येणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे पीजीसीईटीला अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अधिक माहितीसाठी केईएच्या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.