बेळगावमध्ये पेट्रोल-डिझेल वितरण सुरळीत
आंदोलनाचा परिणाम नाही
बेळगाव : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधातील आंदोलनात ट्रक, टँकर चालक सहभागी झाल्याने काही राज्यांमध्ये पेट्रोलचा तुटवडा भासू लागला आहे. परंतु बेळगाव जिल्ह्यामध्ये पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा असून सध्या तरी कोणत्याही प्रकारचा तुटवडा जाणवलेला नाही. त्यामुळे इतर राज्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गर्दी होत असताना बेळगावमध्ये मात्र सुरळीत पद्धतीने पेट्रोल पुरवठा सुरू आहे. हिट अॅण्ड रन घटनांशी संबंधित केंद्र सरकारने नवा कायदा लागू केला आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून एखाद्याचा मृत्यू झाल्यास, तसेच तेथून पळून गेल्यास कारावास, तसेच भारी दंड आकारण्यात येणार आहे. या नव्या कायद्याविरोधात देशभरातील टँकर व ट्रकचालक रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये काही ठिकाणी इंधन वाहतूक करणारे टँकरचालकही सहभागी झाल्याने बेळगाव शेजारील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये इंधनाचा तुटवडा भासत आहे. इतर राज्यांमध्ये अफवांचे पीक असतानाही बेळगावमध्ये इंधन वितरण सुरळीत पद्धतीने सुरू आहे. बेळगाव शहराशेजारीच देसूर येथील फ्युएल स्टेशनवरून इंधनाचा पुरवठा केला जातो. त्यामुळे तितकीशी मोठी वाहतूक करावी लागत नाही. मंगळवारी दिवसभरात बेळगावच्या सर्वच पेट्रोलपंपांवर सुरळीतपणे वितरण सुरू असल्याने ट्रक चालकांच्या आंदोलनाचा तितकासा परिणाम जाणवला नाही.
बेळगावमध्ये पुरेसे इंधन उपलब्ध
बेळगावमध्ये सुरळीत पद्धतीने पेट्रोल व डिझेलचे वितरण सुरू आहे. कुठेही इंधनाचा तुटवडा जाणवल्याची माहिती अद्याप आपल्याकडे नाही. बेळगावमध्ये पुरेसे इंधन असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच पेट्रोलपंपांवर गर्दी करू नये.
-राजदीप कौजलगी (पेट्रोलपंप असो.चे अध्यक्ष)
Home महत्वाची बातमी बेळगावमध्ये पेट्रोल-डिझेल वितरण सुरळीत
बेळगावमध्ये पेट्रोल-डिझेल वितरण सुरळीत
आंदोलनाचा परिणाम नाही बेळगाव : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधातील आंदोलनात ट्रक, टँकर चालक सहभागी झाल्याने काही राज्यांमध्ये पेट्रोलचा तुटवडा भासू लागला आहे. परंतु बेळगाव जिल्ह्यामध्ये पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा असून सध्या तरी कोणत्याही प्रकारचा तुटवडा जाणवलेला नाही. त्यामुळे इतर राज्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गर्दी होत असताना बेळगावमध्ये मात्र सुरळीत पद्धतीने पेट्रोल […]