पीईटी स्कॅनिंग मशीन गोमेकॉत बसवणार

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती : मानसोपचार (आयपीएचबी) इस्पितळाचे नाव बदलणार पणजी : गोमेकॉत पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) स्कॅन करणारे मशिन बसविण्यात येणार आहे. पीईटी ही इमेजिंग चाचणी आहे. जी तुमच्या अवयवांचे चयापचय किंवा जैवरासायनिक कार्य उघड करण्यात मदत करू शकते. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण पीईटी मशिन बसविल्यानंतर त्याचा ऊग्णांना अधिक फायदा होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री […]

पीईटी स्कॅनिंग मशीन गोमेकॉत बसवणार

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती : मानसोपचार (आयपीएचबी) इस्पितळाचे नाव बदलणार
पणजी : गोमेकॉत पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) स्कॅन करणारे मशिन बसविण्यात येणार आहे. पीईटी ही इमेजिंग चाचणी आहे. जी तुमच्या अवयवांचे चयापचय किंवा जैवरासायनिक कार्य उघड करण्यात मदत करू शकते. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण पीईटी मशिन बसविल्यानंतर त्याचा ऊग्णांना अधिक फायदा होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी विधानसभा सभागृहात दिली.  विधानसभा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीच्या पुरवण्या सूचना व मागण्यांच्या सत्रात बहुतांश आमदारांनी केलेल्या विविध मागण्यांना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मान्यता दिली. ते म्हणाले की, गोव्यात टाटा मेमोरियल कर्करोग इस्पितळ येत्या दीड ते दोन वर्षांत सुरू होणार आहे. काही परवान्यांसाठी हे इस्पितळ सुरू होण्यास उशिर झाला आहे. परंतु लवकरच हे इस्पितळ ऊग्णांसाठी उपलब्ध करण्याचा सरकार विचार आहे. टाटा मेमोरियल कर्करोग इस्पितळ सुरू झाल्यानंतर त्यावर सरकारचा पूर्णपणे अंकुश राहील, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी सभागृहात सांगितले. राज्यातील आरोग्य केंद्रांसाठी सरकार नीती धोरणाप्रमाणे आवश्यक गोष्टींची पूर्तता करणार आहे. ज्या-ज्या ठिकाणी आरोग्य केंद्रात सोयी-सुविधा अपूर्ण आहेत, त्या नीती धोरणांतर्गत पूर्ण केल्या जातील, असे आरोग्यमंत्री राणे म्हणाले.
108 सेवा नि:स्वार्थ भावनेने कार्यरत
गोमेकॉत 108 सेवा ही नि:स्वार्थ भावनेने कार्यरत आहे. ही सेवा ऊग्णांना अत्यंत कठीण प्रसंगात उपयोगी पडत असल्याने 108 ऊग्णवाहिकांची संख्या वाढविणार आहे. त्याचा फायदा गोमेकॉ इस्पितळ याबरोबरच राज्यातील उपजिल्हा इस्पितळांनाही होईल, असे आरोग्यमंत्री राणे यांनी सभागृहात सांगितले.
गरज पडल्यास रुग्णांना 1 लाख रुपयांचे इंजेक्शन 
गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामुळे गोव्याचे नाव भारतात अभिमानाने घेतले जाते. याचे कारण म्हणजे बांबोळी इस्पितळात आरोग्यविषयक मिळणारी सुविधा ही उच्च दर्जाची आहे. या ठिकाणी ऊग्णांना अनेक सवलती व सोयी-सुविधा प्राप्त करून देण्यास सरकारने कधीच पाठीमागे पाहिलेले नाही. गरज पडल्यास गंभीर आजारांच्या ऊग्णांना 1 लाख ऊपयांचे इंजेक्शनही देण्याची या ठिकाणी सोय करण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी इस्पितळ आहेत, परंतु डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी यांची आवश्यकता असल्याची मागणी सभागृहात अनेक आमदारांनी केलेली आहे. आरोग्य केंद्रात सोयी-सुविधा पुरविण्याबरोबरच आवश्यक मनुष्यबळही देण्यासाठी सरकार कधी पाठीमागे सरले नाही. तरीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून ज्या ज्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळाची गरज आहे, त्याची चाचणी करून ते पुरवले जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी सभागृहात दिले.
आरोग्य इस्पितळांत टप्प्याटप्प्याने सुविधांचा विस्तार
राज्यातील उपजिल्हा इस्पितळे सर्वोत्कृष्ट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी काही सेवा आऊटसोर्स कराव्या लागणार आहेत. राज्यात काही ठिकाणी डॉक्टरांची उणीव आहे. गोव्यातील तज्ञ डॉक्टर जे बाहेर गेले आहेत, त्यांना राज्यात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. सरकारच्या प्रयत्नामुळे अमर प्रभुदेसाई आणि इतर तज्ञ डॉक्टर सेवा देण्यासाठी तयार झाले आहेत. टप्याटप्याने आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.