कडधान्य पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

शेतकरी चिंतेत, कीड नियंत्रणासाठी प्रयत्न आवश्यक, रब्बी हंगाम संकटात बेळगाव : रब्बी हंगामातील कडधान्य पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मसूर, वाटाणा, हरभरा यासह काकडीच्या अळींवर प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढू लागली आहे. आधीच खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यातच आता रब्बी हंगामातील पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे रब्बी हंगाम संकटात येण्याची […]

कडधान्य पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

शेतकरी चिंतेत, कीड नियंत्रणासाठी प्रयत्न आवश्यक, रब्बी हंगाम संकटात
बेळगाव : रब्बी हंगामातील कडधान्य पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मसूर, वाटाणा, हरभरा यासह काकडीच्या अळींवर प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढू लागली आहे. आधीच खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यातच आता रब्बी हंगामातील पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे रब्बी हंगाम संकटात येण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यात अडीच लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, पावसाचा अभाव आणि बदलत्या हवामानामुळे पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे साहजिकच यंदा रब्बी उत्पादनातही घट होणार आहे. रब्बी हंगामात मसूर, वाटाणा, हरभरा, सोयाबीन, उडीद आदी पिकांची पेरणी केली जाते. मात्र, जमिनीत ओलावा नसल्यामुळे पेरणीचे क्षेत्र घटले आहे. त्यातच आता पेरणी झालेल्या कडधान्य पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. विशेषत: मसूर, वाटाणा, हरभरा आणि खरबूज व काकडीच्या अळींवर किडे दिसून येत आहेत. हिरव्या रंगाचे किडे पहावयास मिळत आहेत. त्यामुळे कृषी खात्याने किडीवर नियंत्रण आणण्यासाठी कीटकनाशक उपलब्ध करावीत, अशी मागणीही होत आहे. बदलत्या हवामानामुळे कडधान्य पिके अडचणीत आली आहेत. त्यातच आता पिकांवर कीड पडत असल्याने पाने पिवळी व लालसर होऊ लागली आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम देखील संकटात येऊ लागला आहे. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामावर होत्या. मात्र, आता रब्बी हंगामातील पिकांवरही कीड दिसून येत असल्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
कृषी पत्तीन संघ-रयत संपर्क केंद्रांमध्ये कीटकनाशक उपलब्ध
किडीचा नाश करण्यासाठी कृषी पत्तीन संघ आणि रयत संपर्क केंद्रांमध्ये कीटकनाशक उपलब्ध करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी कीड लक्षात घेऊन कीटकनाशकाची फवारणी करावी. बदलत्या हवामानामुळे पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन कीटकनाशक खरेदी करावे.
-एम.एस. पटगुंदी (तालुका कृषी अधिकारी)

Go to Source