भंडारी समाजाच्या चार नेत्यांची सतावणूक बंद करावी : किरण

पणजी : गोवा सरकारने व केंद्र सरकारने ज्या भंडारी समाजाच्या चार नेत्यांना ईडीसमोर आणून उभे करून त्यांची जी सामाजिक स्तरावर सतावणूक सुरू केली आहे ती ताबडतोब बंद करावी, अन्यथा लोकसभा निवडणुकीत भाजपला हे सारे मारक ठरणार असल्याचा इशारा माजी आमदार व भंडारी समाजाचे नेते किरण कांदोळकर यांनी दिला आहे. कांदोळकर यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना […]

भंडारी समाजाच्या चार नेत्यांची सतावणूक बंद करावी : किरण

पणजी : गोवा सरकारने व केंद्र सरकारने ज्या भंडारी समाजाच्या चार नेत्यांना ईडीसमोर आणून उभे करून त्यांची जी सामाजिक स्तरावर सतावणूक सुरू केली आहे ती ताबडतोब बंद करावी, अन्यथा लोकसभा निवडणुकीत भाजपला हे सारे मारक ठरणार असल्याचा इशारा माजी आमदार व भंडारी समाजाचे नेते किरण कांदोळकर यांनी दिला आहे. कांदोळकर यांनी दैनिक भारत लाईव्ह न्यूज मीडियाशी बोलताना सांगितले की, भंडारी समाजाच्या चार नेत्यांना ईडीच्या कार्यालयात उभे केले, यातून आपल्याला सखेदाश्चर्य वाटले. भंडारी समाजाला व त्यांच्या नेत्यांना हा टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. अलिकडेच महाशिवरात्री उत्सवादरम्यान भंडारी समाजाच्या कार्यात ज्या पद्धतीने धुसफूस सुरू केली व हस्तक्षेप करण्यात आला तो प्रकार अत्यंत आक्षेपार्ह असल्याचा दावा कांदोळकर यांनी केला. दोन्ही प्रकार हे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाले आहेत. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत भाजपला भोगावे लागतील, असा इशारा किरण कांदोळीकर यांनी दिला आहे.