अद्ययावत पोस्ट कार्यालय उद्यमबागमध्ये उभारण्यास परवानगी

बेळगाव : बेळगावची औद्योगिक वसाहत असणाऱ्या उद्यमबागमध्ये अद्ययावत पोस्ट ऑफिस उघडले जाणार आहे. पोस्ट कार्यालयाच्या जागेमध्ये हे पोस्ट ऑफिस उभारणीसाठी केंद्रीय मंत्र्यांकडून परवानगी देण्यात आली. त्यामुळे लवकरच चन्नम्मानगरप्रमाणे उद्यमबाग येथे हायटेक पोस्ट ऑफिस उपलब्ध होणार आहे. सध्या कॅम्पमधील मुख्य कार्यालयासह टिळकवाडी, माळमारुती, चन्नम्मानगर येथे पोस्टाची स्वत:च्या जागेमध्ये कार्यालये आहेत. उद्यमबाग येथे औद्योगिक वसाहत असल्याने मोठ्या […]

अद्ययावत पोस्ट कार्यालय उद्यमबागमध्ये उभारण्यास परवानगी

बेळगाव : बेळगावची औद्योगिक वसाहत असणाऱ्या उद्यमबागमध्ये अद्ययावत पोस्ट ऑफिस उघडले जाणार आहे. पोस्ट कार्यालयाच्या जागेमध्ये हे पोस्ट ऑफिस उभारणीसाठी केंद्रीय मंत्र्यांकडून परवानगी देण्यात आली. त्यामुळे लवकरच चन्नम्मानगरप्रमाणे उद्यमबाग येथे हायटेक पोस्ट ऑफिस उपलब्ध होणार आहे. सध्या कॅम्पमधील मुख्य कार्यालयासह टिळकवाडी, माळमारुती, चन्नम्मानगर येथे पोस्टाची स्वत:च्या जागेमध्ये कार्यालये आहेत. उद्यमबाग येथे औद्योगिक वसाहत असल्याने मोठ्या कार्यालयाची गरज भासत होती. त्यामुळे पोस्ट विभागाने खासदार मंगला अंगडी यांच्याकडे कार्यालयाची मागणी केली होती. खासदार अंगडी यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन उद्यमबाग येथील पोस्ट कार्यालयाच्या बांधकामासाठी परवानगी मागितली होती. मंजुरीचे पत्र नुकतेच साहाय्यक पोस्ट अधीक्षक इराण्णा मुतनाळी यांच्याकडे खासदारांनी हस्तांतरित केले आहे.