लियॉन स्पर्धेत पेरिकार्ड अजिंक्य
वृत्तसंस्था/ लियॉन
एटीपी टूरवरील येथे झालेल्या लियॉन खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत 20 वर्षीय पेरिकार्डने एकेरीचे जेतेपद पटकाविताना अर्जेंटिनाच्या टॉमस इचेवेरीचा पराभव केला. एटीपी टूरवरील पेरिकार्डचे हे पहिले विजेतेपद आहे. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या पेरिकार्डने इचेवेरीचा 6-4, 1-6, 7-6(7-5) असा पराभव केला. या जेतेपदानंतर पेरिकार्डला फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे स्पर्धा आयोजकांनी प्रवेश दिल्याने हा चालू आठवडा यशस्वी ठरला आहे. फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पेरिकार्डचा सलामीचा सामना डेविड गोफीनशी तर इचेवेरीचा सलामीचा सामना फ्रान्सच्या आर्थर केझॉक्सशी हाणार आहे.
Home महत्वाची बातमी लियॉन स्पर्धेत पेरिकार्ड अजिंक्य
लियॉन स्पर्धेत पेरिकार्ड अजिंक्य
वृत्तसंस्था/ लियॉन एटीपी टूरवरील येथे झालेल्या लियॉन खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत 20 वर्षीय पेरिकार्डने एकेरीचे जेतेपद पटकाविताना अर्जेंटिनाच्या टॉमस इचेवेरीचा पराभव केला. एटीपी टूरवरील पेरिकार्डचे हे पहिले विजेतेपद आहे. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या पेरिकार्डने इचेवेरीचा 6-4, 1-6, 7-6(7-5) असा पराभव केला. या जेतेपदानंतर पेरिकार्डला फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे स्पर्धा आयोजकांनी प्रवेश दिल्याने […]