वाढत्या उष्णतेने जनता हैराण

शुक्रवारी पारा 35.8 डिग्री से.च्या वर : पारा 37 पर्यंत जाण्याचा अंदाज,वादळी वाऱ्यासह पावसाचीही शक्यता पणजी : गोव्यातील तापमानाचा पारा वाढत असून काल शुक्रवारी राजधानी पणजीत 35.8 डिग्री सेलियस तापमानाची नोंद झाल्याचे समोर आले आहे. आगामी दोन दिवसात ते तापमान 37 डिग्रीपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, 2 ते 4 जून या कालावधीत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता […]

वाढत्या उष्णतेने जनता हैराण

शुक्रवारी पारा 35.8 डिग्री से.च्या वर : पारा 37 पर्यंत जाण्याचा अंदाज,वादळी वाऱ्यासह पावसाचीही शक्यता
पणजी : गोव्यातील तापमानाचा पारा वाढत असून काल शुक्रवारी राजधानी पणजीत 35.8 डिग्री सेलियस तापमानाची नोंद झाल्याचे समोर आले आहे. आगामी दोन दिवसात ते तापमान 37 डिग्रीपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, 2 ते 4 जून या कालावधीत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. वरील तीन दिवसांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गेले काही दिवस पाऊस नसल्याने आणि पारा वाढल्याने जनता उष्णतेने हैराण झाली असून पावसाची प्रतिक्षा करीत आहे. उन्हाचे चटके वाढल्याने शाळा एक दोन दिवसांनी पुढे ढकलण्याची मागणी पुन्हा एकदा होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने गोव्यात हजेरी लावलेली नाही त्यामुळे पारा चढत असून उष्णता वाढत आहे. केरळात पाऊस दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी तो गोव्यात केव्हा पोहोचणार हे अजून निश्चित नाही. येत्या 4 ते 5 दिवसात तो गोव्यात बरसेल असे सांगण्यात आले आहे.