रिझवानला बाद ठरविल्याने पीसीबी नाराज

मुद्दा आयसीसीसमोर नेणार वृत्तसंस्था/ कराची ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद रिझवानला वादग्रस्तरीत्या बाद देण्यात आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) पंचगिरी आणि तंत्रज्ञानाच्या वापराशी संबंधित मुद्दे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळापुढे (आयसीसी) मांडण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी, ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने रिझवानचा झेल यष्टिरक्षकाने घेतल्याचे अपिल केल्यानंतर मैदानावरील पंचांनी त्याला बाद देण्यास नकार दिला होता. […]

रिझवानला बाद ठरविल्याने पीसीबी नाराज

मुद्दा आयसीसीसमोर नेणार
वृत्तसंस्था/ कराची
ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद रिझवानला वादग्रस्तरीत्या बाद देण्यात आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) पंचगिरी आणि तंत्रज्ञानाच्या वापराशी संबंधित मुद्दे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळापुढे (आयसीसी) मांडण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी, ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने रिझवानचा झेल यष्टिरक्षकाने घेतल्याचे अपिल केल्यानंतर मैदानावरील पंचांनी त्याला बाद देण्यास नकार दिला होता. परंतु ऑस्ट्रेलियन संघाने त्याच्या विरोधात दाद मागितली होती आणि ‘डीआरएस’द्वारे हा निर्णय बदलण्यात यश मिळवले होते.
तथापि, चेंडू रिझवानच्या मनगटाच्या अगदी वर असतानाही ‘स्निकोमीटर’ने त्यावर ‘स्पाइक’ दाखविल्याने आणि नाबाद असल्याचा निर्णय बदलण्यात आल्याने पाकिस्तानी गोटात नाराजी पसरली. पीसीबीमधील एका विश्वसनीय सूत्राने सांगितले की, त्यांचे प्रमुख झका अश्रफ यांनी संघ संचालक मोहम्मद हाफीज यांच्याशी संभाषण केलेले आहे. हाफीज यांनी त्यांना मेलबर्न कसोटीतील पंचगिरी आणि तंत्रज्ञानाच्या वापराविषयी काही मुद्दे सांगितले. या कसोटीत त्यांचा 79 धावांनी पराभव झाला.
आता, पीसीबी हे मुद्दे आयसीसीसमोर मांडण्यासाठी सज्ज झाले आहे. शुक्रवारी एमसीजीवरील सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सहभागी झाल्यावेळी हाफीज स्पष्टपणे नाराज दिसले. कसोटीच्या निकालावर ज्यांनी परिणाम केला त्यापैकी सातत्य नसलेली पंचगिरी आणि तंत्रज्ञानाची आव्हाने यावर प्रकाशझोत टाकण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. आपण संपूर्ण खेळ पाहिला, तर पंचांचे निर्णय अत्यंत विसंगत होते. क्रिकेटचा हा सुंदर खेळ आपण नैसर्गिक वृत्तीने खेळतो आणि आम्हा सर्वांना या खेळाच्या मूलभूत बाबी माहीत आहेत’, असे ते म्हणाले.