पेटीएमला मिळणार व्यावसायिकांचा पाठिंबा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऑनलाईन पेमेंटप्रणालीमध्ये कार्यरत असणाऱ्या पेटीएमच्या अडचणी संपता संपेना अशी अवस्था असताना त्यांचे अॅप वापणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांना पाठिंबा देण्याचे ठरविले असल्याचे समजते. रविवारी पेटीएमने आपल्या एका ब्लॉगवर एक माहिती प्रसारित केली होती. त्यामध्ये त्यांनी पेटीएमला व्यावसायिकांनी पाठिंबा दिला असल्याचे नमूद केले असून सर्व सेवा सुरू ठेवण्याचे आश्वासनही दिल्याचे ब्लॉगवर स्पष्ट करण्यात आले आहे.
कंपनीच्या अॅपचा वापर करणाऱ्या देशातील नामवंत व्यावसायिकांनी त्यांना आधार दिला आहे. आपल्या ग्राहकांना पेटीएमची सेवा देत राहू, असे म्हटले आहे. तसेच आपल्या ब्लॉगवर पेटीएमने व्यापाऱ्यांना आधीप्रमाणेच क्यूआर कोड, साऊंड बॉक्स आणि कार्ड मशिन सारख्या सेवांचा लाभ घेता येणार असल्याचे म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने पेटीएमवर अलिकडेच कारवाई केली होती. त्यांच्या कारवाईनुसार 29 फेब्रुवारीनंतर पेटीएमशी निगडित खाते (अकौंट), व्हॉलेट, फास्ट टॅग व अन्य सुविधांचा लाभ घेता येणार नाही.
Home महत्वाची बातमी पेटीएमला मिळणार व्यावसायिकांचा पाठिंबा
पेटीएमला मिळणार व्यावसायिकांचा पाठिंबा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली ऑनलाईन पेमेंटप्रणालीमध्ये कार्यरत असणाऱ्या पेटीएमच्या अडचणी संपता संपेना अशी अवस्था असताना त्यांचे अॅप वापणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांना पाठिंबा देण्याचे ठरविले असल्याचे समजते. रविवारी पेटीएमने आपल्या एका ब्लॉगवर एक माहिती प्रसारित केली होती. त्यामध्ये त्यांनी पेटीएमला व्यावसायिकांनी पाठिंबा दिला असल्याचे नमूद केले असून सर्व सेवा सुरू ठेवण्याचे आश्वासनही दिल्याचे ब्लॉगवर स्पष्ट करण्यात आले […]