पेटीएम पेमेंट बँकेच्या स्वतंत्र संचालिका मंजू अग्रवाल यांचा राजीनामा

आता फक्त तीन संचालक शिल्लक असल्याची माहिती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या स्वतंत्र संचालक मंजू अग्रवाल यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. वन 97 कम्युनिकेशनने त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला सोमवारी पुष्टी दिली आहे. गेल्या आठवड्यात, मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की पीपीबीएल बोर्ड सदस्य शिंजिनी कुमार आणि मंजू अग्रवाल यांना बोर्डातून पायउतार केले […]

पेटीएम पेमेंट बँकेच्या स्वतंत्र संचालिका मंजू अग्रवाल यांचा राजीनामा

आता फक्त तीन संचालक शिल्लक असल्याची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या स्वतंत्र संचालक मंजू अग्रवाल यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. वन 97 कम्युनिकेशनने त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला सोमवारी पुष्टी दिली आहे. गेल्या आठवड्यात, मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की पीपीबीएल बोर्ड सदस्य शिंजिनी कुमार आणि मंजू अग्रवाल यांना बोर्डातून पायउतार केले होते. मात्र, शिंजिनी कुमार यांच्या राजीनाम्याबाबत कंपनीने अद्याप काहीही सांगितलेले नाही.
कंपनीने सांगितले- कामावर किंवा व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही. वन 97 कम्युनिकेशनने फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, मंजू अग्रवाल यांनी 1 फेब्रुवारी रोजी वैयक्तिक कारणांमुळे बोर्डाचा राजीनामा दिला आहे. याचा कंपनीच्या कामकाजावर किंवा व्यवसायावर परिणाम होणार नाही. मंजू यांच्या राजीनाम्यानंतर आता पीपीबीएलच्या संचालक मंडळावर चार स्वतंत्र संचालक आहेत. शिंजिनी कुमार यांनी बोर्ड सोडल्याचे सांगितले जात असून तसे असेल तर मंडळात फक्त 3 सदस्य उरतील.
यामध्ये पंजाब अँड सिंध बँकेचे माजी कार्यकारी संचालक अरविंद कुमार जैन, एक्सेंचरचे माजी एमडी पंकज वैश आणि डीपीआयआयटीचे माजी सचिव रमेश अभिषेक यांचा समावेश आहे. अहवालानुसार, अग्रवाल मे 2021 पासून कंपनीच्या संचालक मंडळावर होते.
मंजू एसबीआयमध्ये डेप्युटी एमडी पदावरून निवृत्त झाल्या होत्या. मंजू अग्रवाल यांनी एसबीआयमध्ये 34 वर्षे विविध पदांवर काम केले. त्या डेप्युटी एमडी पदावरून निवृत्त झाल्या होत्या. तर, शिंजिनी कुमार यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेपूर्वी सिटी बँक, पीडब्ल्यूसी इंडिया आणि बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचमध्ये काम केले आहे.