कविता “पाऊस आला रे आला”

पाऊस आला रे आला धारा झेला रे झेला झाडे झाली हिरवी गाणी रुणझुण पैंजण पानोपानी सुगंध ओला रे ओला पाऊस आला रे आला काळ्या काळ्या नौकेपरी ढग
कविता “पाऊस आला रे आला”

पाऊस आला रे आला
धारा झेला रे झेला

झाडे झाली हिरवी गाणी
रुणझुण पैंजण पानोपानी
सुगंध ओला रे ओला
पाऊस आला रे आला

काळ्या काळ्या नौकेपरी ढग
झुलू लागले क्षितिजावर बघ
डोंगर न्हाला रे न्हाला
पाऊस आला रे आला

कधी अचानक येतो म्हणतो
येताच नाही चकवा देतो
रिमझिम झाला रे झाला
पाऊस आला रे आला

पाऊस गाण्यासवे मुलांच्या
हळव्या गंधासवे फुलांच्या
गाणे झाला रे झाला
पाऊस आला रे आला

-मंगेश पाडगांवकर