आरेमध्ये लावलेल्या झाडांची बिकट अवस्था

आरे (aarey) मधील युनिट 4 येथे केलेल्या वृक्षरोपणाची दयनीय अवस्था झाली आहे. या वृक्ष लागवडीसाठी एमएमआरसीएलने (mmrcl) लाखो रुपये खर्च केले आहेत. दरम्यान, या वृक्षलागवडीतील अनेक झाडे उन्मळून (felling of trees) पडली असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता पर्यावरणप्रेमींनी केला आहे.‘मेट्रो-3’ मार्गिकेच्या कामासाठी 33.5 किमीच्या परिसरातील झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करावी लागली होती. झाडांच्या कत्तलीवरून मोठा वादही झाला होता. हा वाद न्यायालयात गेला आहे. दरम्यान, उच्च न्यायालयात (bombay high court) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ‘एमएमआरसीएल’ वृक्षारोपण करीत आहे, असे सातत्याने सांगण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत आरेमधील युनिट 4 येथील गावदेवी मंदिरासमोरील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी, तसेच समाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. झाडे लावून ती जगत नाहीत ही गंभीर बाब आहे, असे मत समाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी व्यक्त केले. तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस असल्यामुळे झाडे तग धरतात. मात्र, नंतर या झाडांची काळजी घेणे आवश्यक असते. परंतु ते होताना दिसत नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, या वृक्षरोपणाचा ‘मेट्रो 3’ किंवा ‘एमएमआरसीएल’शी कोणताही संबंध नसल्याचे ‘एमएमआरसीएल’च्या प्रवक्त्यांनी सांगितले. तसेच आरेमधील वृक्षरोपणासाठी कंत्राटदाराची (contractor) नियुक्ती केली आहे. झाडांचे परिसरात रोपण करणे, झाडांचे संगोपन करणे, आणि तीन वर्षे झाडांची देखभाल करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान एखादे झाड मृत झाल्यास त्या बदल्यात नवीन झाड लावणे बंधनकारक आहे. दरम्यान, ‘मेट्रो 3’च्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने आतापर्यंत 3,772 झाडे हटविण्यास परवानगी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात 3,093 झाडेच हटविल्याची माहिती एमएमआरसीएलकडून देण्यात आली. तर 679 झाडे वाचविण्यात एमएमआरसीएलला यश आल्याचेही स्पष्ट केले आहे. यानुसार एमएमआरसीएलच्या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत ‘मेट्रो 3’ मार्गिकेतील स्थानक परिसरात 2931 झाडे लावण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला होता. या मोहिमेअंतर्गत मरोळ स्थानकाबाहेर लावलेली काही झाडे उन्मळून पडली होती. यावेळीही पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. या 2931 झाडांच्या रोपण मोहिमेसाठी 12 कोटी 1 लाख 66 हजार 136 रुपयांची तीन कंत्राटे देण्यात आली आहेत. यानुसार एका झाडासाठी 41 हजार रुपये खर्च येत असल्याचेही एमएमआरसीएलने स्पष्ट केले होते.हेही वाचा मुंबईतील 3000 पार्किंग स्पॉट्सवर अॅप-आधारित पार्किंग सिस्टम येणार पार्ले पंचम संघटनेची मुंबईत मराठी लोकांच्या राखीव घरांसाठी मागणी

आरेमध्ये लावलेल्या झाडांची बिकट अवस्था

आरे (aarey) मधील युनिट 4 येथे केलेल्या वृक्षरोपणाची दयनीय अवस्था झाली आहे. या वृक्ष लागवडीसाठी एमएमआरसीएलने (mmrcl) लाखो रुपये खर्च केले आहेत. दरम्यान, या वृक्षलागवडीतील अनेक झाडे उन्मळून (felling of trees) पडली असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता पर्यावरणप्रेमींनी केला आहे.‘मेट्रो-3’ मार्गिकेच्या कामासाठी 33.5 किमीच्या परिसरातील झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करावी लागली होती. झाडांच्या कत्तलीवरून मोठा वादही झाला होता. हा वाद न्यायालयात गेला आहे. दरम्यान, उच्च न्यायालयात (bombay high court) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ‘एमएमआरसीएल’ वृक्षारोपण करीत आहे, असे सातत्याने सांगण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत आरेमधील युनिट 4 येथील गावदेवी मंदिरासमोरील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी, तसेच समाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. झाडे लावून ती जगत नाहीत ही गंभीर बाब आहे, असे मत समाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी व्यक्त केले. तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस असल्यामुळे झाडे तग धरतात. मात्र, नंतर या झाडांची काळजी घेणे आवश्यक असते. परंतु ते होताना दिसत नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, या वृक्षरोपणाचा ‘मेट्रो 3’ किंवा ‘एमएमआरसीएल’शी कोणताही संबंध नसल्याचे ‘एमएमआरसीएल’च्या प्रवक्त्यांनी सांगितले.तसेच आरेमधील वृक्षरोपणासाठी कंत्राटदाराची (contractor) नियुक्ती केली आहे. झाडांचे परिसरात रोपण करणे, झाडांचे संगोपन करणे, आणि तीन वर्षे झाडांची देखभाल करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान एखादे झाड मृत झाल्यास त्या बदल्यात नवीन झाड लावणे बंधनकारक आहे. दरम्यान, ‘मेट्रो 3’च्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने आतापर्यंत 3,772 झाडे हटविण्यास परवानगी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात 3,093 झाडेच हटविल्याची माहिती एमएमआरसीएलकडून देण्यात आली. तर 679 झाडे वाचविण्यात एमएमआरसीएलला यश आल्याचेही स्पष्ट केले आहे. यानुसार एमएमआरसीएलच्या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत ‘मेट्रो 3’ मार्गिकेतील स्थानक परिसरात 2931 झाडे लावण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला होता. या मोहिमेअंतर्गत मरोळ स्थानकाबाहेर लावलेली काही झाडे उन्मळून पडली होती. यावेळीही पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. या 2931 झाडांच्या रोपण मोहिमेसाठी 12 कोटी 1 लाख 66 हजार 136 रुपयांची तीन कंत्राटे देण्यात आली आहेत. यानुसार एका झाडासाठी 41 हजार रुपये खर्च येत असल्याचेही एमएमआरसीएलने स्पष्ट केले होते.हेही वाचामुंबईतील 3000 पार्किंग स्पॉट्सवर अॅप-आधारित पार्किंग सिस्टम येणारपार्ले पंचम संघटनेची मुंबईत मराठी लोकांच्या राखीव घरांसाठी मागणी

Go to Source