दिवा रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरट्यामुळे प्रवाशाने गमावला हात
दिवा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या लोकल प्रवाशाच्या हातातील मोबाईल चोरट्याने हिसकावून घेतल्याची घटना समोर आली असून त्यामुळे खाली पडल्याने प्रवाशाच्या खांद्यापासून डावा हात निकामी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.शशिकांत कुमार (22) असे डावा हात गमावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. गणेश शिंदे (29) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शशिकांत कुमार हे नवी मुंबईतील घणसोली परिसरात राहतात. रविवारी ते वांगणी येथील बहिणीच्या घरी गेले होते. तेथून ते रात्री लोकल ट्रेनने घरी परतत होते. दारात उभे राहून ते प्रवास करत होते. रात्री 11.55 वाजता लोकल ट्रेन दिवा स्थानकात आली असता, त्यावेळी दिवा स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर उभ्या असलेल्या गणेश शिंदे याने त्याच्या हातावर जोरदार प्रहार करून त्याचा मोबाईल काढून घेतला. यामुळे तोल जाऊन ते खाली पडले. या घटनेनंतर इतर प्रवाशांनी तत्काळ गणेश शिंदे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.प्लॅटफॉर्म आणि मालगाडीमधील जागेत पडल्याने शशिकांतचा डावा हात लोकलखाली येऊन खांद्यापासून तुटला. प्रवाशांनी पोलिसांच्या मदतीने जखमी शशिकांतला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गणेशला पोलिसांनी अटक केली आहे.हेही वाचाभाईंदर ते वसई रो-रो सेवा सुरू
पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्या, ‘इतक्या’ ट्रेन्स धावणार
Home महत्वाची बातमी दिवा रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरट्यामुळे प्रवाशाने गमावला हात
दिवा रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरट्यामुळे प्रवाशाने गमावला हात
दिवा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या लोकल प्रवाशाच्या हातातील मोबाईल चोरट्याने हिसकावून घेतल्याची घटना समोर आली असून त्यामुळे खाली पडल्याने प्रवाशाच्या खांद्यापासून डावा हात निकामी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.
शशिकांत कुमार (22) असे डावा हात गमावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. गणेश शिंदे (29) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शशिकांत कुमार हे नवी मुंबईतील घणसोली परिसरात राहतात.
रविवारी ते वांगणी येथील बहिणीच्या घरी गेले होते. तेथून ते रात्री लोकल ट्रेनने घरी परतत होते. दारात उभे राहून ते प्रवास करत होते. रात्री 11.55 वाजता लोकल ट्रेन दिवा स्थानकात आली असता, त्यावेळी दिवा स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर उभ्या असलेल्या गणेश शिंदे याने त्याच्या हातावर जोरदार प्रहार करून त्याचा मोबाईल काढून घेतला. यामुळे तोल जाऊन ते खाली पडले. या घटनेनंतर इतर प्रवाशांनी तत्काळ गणेश शिंदे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
प्लॅटफॉर्म आणि मालगाडीमधील जागेत पडल्याने शशिकांतचा डावा हात लोकलखाली येऊन खांद्यापासून तुटला. प्रवाशांनी पोलिसांच्या मदतीने जखमी शशिकांतला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गणेशला पोलिसांनी अटक केली आहे.हेही वाचा
भाईंदर ते वसई रो-रो सेवा सुरूपश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्या, ‘इतक्या’ ट्रेन्स धावणार