रेती वाहतुकीसाठी देणार पास

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : गोवा, महाराष्ट्रातील वाहतूकदारांचा समेट पणजी : गोव्यात सध्या रेती मिळत नसल्याने स्थानिकांना घरे बांधताना व इतर कामे करताना अडचणीचे ठरले आहे. याचे कारण म्हणजे गोवा आणि महाराष्ट्र रेती वाहतूकदारांमध्ये सुरू असलेला वाद हे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत मध्यस्ती केल्याने येत्या नवीन […]

रेती वाहतुकीसाठी देणार पास

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : गोवा, महाराष्ट्रातील वाहतूकदारांचा समेट
पणजी : गोव्यात सध्या रेती मिळत नसल्याने स्थानिकांना घरे बांधताना व इतर कामे करताना अडचणीचे ठरले आहे. याचे कारण म्हणजे गोवा आणि महाराष्ट्र रेती वाहतूकदारांमध्ये सुरू असलेला वाद हे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत मध्यस्ती केल्याने येत्या नवीन वर्षात 5 जानेवारीपासून रेती वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. दोन्ही राज्यांतील रेती वाहतूकदारांना गोव्याच्या खाण खात्याकडून पास दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि गोवा रेती वाहतूकदार संघटनांच्या सदस्यांमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे राज्याला बांधकामांसाठी रेतीची तीव्र कमतरता जाणवत आहे. परंतु आता हा वाद मिटविण्यात येणार असून, गोवा सरकारमार्फत रेती वाहतुकीसाठी कार्यालयीन पास प्रक्रिया राबवून गोव्यातील वाहने महाराष्ट्रात जातील आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील वाहने तेथील प्रक्रिया पूर्ण करून गोव्यात रेती पुरवतील.
नीलेश राणे भेटले मुख्यमंत्र्यांना
गोवा व महाराष्ट्रातील रेती वाहतूकदारांमध्ये सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी महाराष्ट्राचे माजी खासदार नीलेश राणे यांनी काल शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पेडणेचे आमदार जीत आरोलकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
रेती दरांवर येणार निर्बंध
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र आणि गोवा रेती वाहतूकदार संघटनेची संयुक्त बैठक  झाल्याने दोन्ही राज्यांच्या संघटनांमधील वाद संपुष्टात येऊन लवकरच रेती वाहतूक पुन्हा सुरू होईल. गोव्यात गेल्या दोन महिन्यांपासून बांधकामासाठी रेतीची कमतरता जाणवत आहे. कारण वाहतुकीत गुंतलेल्या वाहनांवरून दोन्ही संघटनांमध्ये झालेल्या भांडणामुळे महाराष्ट्रातून गोव्यात होणारी रेती वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही संघटनांच्या या वादामुळे गोव्यात छुप्या मार्गाने रेती पुरविणाऱ्यांकडून रेतीचे दर दुप्पट आकारले जात आहेत. आता दोन्ही संघटनांमधील वाद संपुष्टात येणार असल्याने  वाढलेल्या दरावरही निर्बंध येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
एकूण 440 वाहतूकदारांना पास
गोवा व महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणांहून रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकसाठी खाण संचालनालयामार्फत गोवा सरकार पास जारी करणार आहे. दोन्ही राज्यांतील सुमारे 440 वाहतूकदारांना (गोव्यातील 140 आणि महाराष्ट्रातील 300) खाण विभागाकडून पास जारी केले जातील.
व्यवसाय कायदेशीर करण्याची मागणी
गोव्यात रेती व्यवसाय कायदेशीर करावा, अशी मागणी न्हयबाग-पोरस्कडे येथील रेती व्यावसायिकांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
दलालांनी वाढविले रेतीचे दर
गोव्यात रेतीची कमतरता जाणवत असल्याने काही पुरवठा करणाऱ्या दलालांनी रेतीचे दर भरमसाठ वाढवले आहेत. 5 मीटर रेतीसाठी पूर्वी 8 हजार ऊपये मोजावे लागत होते, आता तोच दर 15 हजार ऊपयांच्या घरात गेला आहे. कुडाळ येथून  रेती आणायची झाल्यास 10 मीटर रेतीच्या ट्रकसाठी सुमारे 25 हजार ऊपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी 10 मीटर रेती खरेदीसाठी 18 हजार ऊपये आकारले जात होते, असे एका बांधकाम व्यावसायिकाने सांगितले.