पशुसखी दिसणार नव्या लुकमध्ये

खात्यातर्फे गणवेश अन् ओळखपत्रांचे वाटप : प्रत्येक ग्रा. पं. हद्दीत एका पशुसखीची नेमणूक बेळगाव : ग्रामीण भागातील जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पशुसखींना नवीन गणवेश आणि ओळखपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आता पशुसखी नव्या लुकमध्ये दिसणार आहेत. पशुसंगोपन खाते आणि पशुपालक शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून जिल्ह्यात 497 पशुसखींची नेमणूक करण्यात आली आहे. या पशुसखींना खात्याकडून गणवेश […]

पशुसखी दिसणार नव्या लुकमध्ये

खात्यातर्फे गणवेश अन् ओळखपत्रांचे वाटप : प्रत्येक ग्रा. पं. हद्दीत एका पशुसखीची नेमणूक
बेळगाव : ग्रामीण भागातील जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पशुसखींना नवीन गणवेश आणि ओळखपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आता पशुसखी नव्या लुकमध्ये दिसणार आहेत. पशुसंगोपन खाते आणि पशुपालक शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून जिल्ह्यात 497 पशुसखींची नेमणूक करण्यात आली आहे. या पशुसखींना खात्याकडून गणवेश आणि ओळखपत्राचे वाटप करण्यात आले आहे. शासनाने जनावरांना वेळेत आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रत्येक ग्रा. पं. हद्दीत एका पशुसखीची नेमणूक केली आहे. आजारी जनावरांची काळजी कशी घ्यावी? जनावरांशी संबंधित प्रथमोपचार, कृत्रिम गर्भधारणा, शासकीय योजना, लसीकरण आणि इतर कामे केली जाणार आहेत. त्यामुळे पशुपालकांना जनावरांच्या संबंधित सर्व गोष्टी गोठ्यापर्यंत उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यात 28 लाखाहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळ्या-मेंढ्या, घोडा, गाढव, डुक्कर आदींचा समावेश आहे. मात्र, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे जनावरांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचत नाहीत. अशा परिस्थितीत पशुसखींचे कार्य मोलाचे ठरते.
जनावरांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम पशुसखीवर
पाच हजार जनावरांमागे एक पशुवैद्य आवश्यक आहे. मात्र, सद्यपरिस्थितीत 30 हजार जनावरांमागे देखील एक वैद्य नाही. त्यामुळे जनावरांना आरोग्याच्या सुविधा पुरविताना अडचणी येऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत पशुपालक आणि पशुवैद्यकीय खाते यांच्यातील दुवा म्हणून पशुसखी काम करत आहेत. ग्रामीण भागात जनावरांची संख्या मोठी आहे. जनावरांपर्यंत आरोग्य सुविधा आणि शासकीय सोयी पुरविण्याची जबाबदारी पशुसखींवर आहे. पशुसखींना ओळखपत्र आणि गणवेश देण्यात आला आहे. त्यामुळे पशुसखी एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहेत.
जिल्ह्यात 497 पशुसखींची नेमणूक
जिल्ह्यात 497 पशुसखींची नेमणूक करण्यात आली आहे. ज्या ग्राम पंचायत हद्दीमध्ये पशुसखींची नेमणूक झाली नाही, त्या ठिकाणी लवकरच नेमणूक केली जाणार आहे. याचबरोबर पशुसखींना ओळखपत्र आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे.
-डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक पशुसंगोपन खाते)