शहराच्या काही भागांमध्ये गुरुवारपर्यंत अंशत: पाणीपुरवठा
बेळगाव : तातडीच्या दुरुस्तीच्या कामास्तव शहराच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यामध्ये व्यत्यय येणार आहे. खानापूर रोडवरील गोगटे सर्कलनजीक 450 एमएमच्या पाईपलाईनला गळती लागली असून ती दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यात व्यत्यय आला. पुढील तीन दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत शहराच्या काही भागांमध्ये अंशत: पाणीपुरवठा होणार आहे. यामध्ये राणी चन्नम्मानगर फर्स्ट व सेकंड स्टेज, मजगाव, राजारामनगर, यादव कॉलनी, चिदंबरनगर, मृत्युंजयनगर, अनगोळ, वडगाव, जुने बेळगाव, हिंदवाडी, ओंकारनगर, पारिजात कॉलनी, शहापूर, भारतनगर, नानावाडी, टिळकवाडी, शास्त्राrनगर व समर्थनगर या भागामध्ये पाणीपुरवठा होण्यात व्यत्यय येणार असल्याचे एलअॅण्डटीने कळविले आहे.
Home महत्वाची बातमी शहराच्या काही भागांमध्ये गुरुवारपर्यंत अंशत: पाणीपुरवठा
शहराच्या काही भागांमध्ये गुरुवारपर्यंत अंशत: पाणीपुरवठा
बेळगाव : तातडीच्या दुरुस्तीच्या कामास्तव शहराच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यामध्ये व्यत्यय येणार आहे. खानापूर रोडवरील गोगटे सर्कलनजीक 450 एमएमच्या पाईपलाईनला गळती लागली असून ती दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यात व्यत्यय आला. पुढील तीन दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत शहराच्या काही भागांमध्ये अंशत: पाणीपुरवठा होणार आहे. यामध्ये राणी चन्नम्मानगर फर्स्ट व […]