Paris Olympics 2024:सात्विक-चिराग या भारतीय जोडीचा पुरुष दुहेरीचा सामना रद्द

सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा भारतीय पुरुष दुहेरी सामना रद्द करण्याचा निर्णय सोमवारी अखेरच्या क्षणी घेण्यात आला. सात्विक-चिरागचा सामना क गटात मार्क लॅम्सफस आणि मार्विन सीडेल या जोडीशी होणार होता,

Paris Olympics 2024:सात्विक-चिराग या भारतीय जोडीचा पुरुष दुहेरीचा सामना रद्द

सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा भारतीय पुरुष दुहेरी सामना रद्द करण्याचा निर्णय सोमवारी अखेरच्या क्षणी घेण्यात आला. सात्विक-चिरागचा सामना क गटात मार्क लॅम्सफस आणि मार्विन सीडेल या जोडीशी होणार होता, परंतु जर्मन खेळाडू लॅम्सफसने दुखापतीमुळे माघार घेतल्याने सामना रद्द करण्यात आला. 

सात्विक आणि चिरागने शनिवारी लुकास कॉर्वी आणि रोनन लाबर या फ्रेंच जोडीवर 21-17, 21-14 असा विजय मिळवत आपल्या मोहिमेला सुरुवात केली. या भारतीय जोडीचा मंगळवारी गटातील अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांतो यांच्याशी सामना होईल.

जर्मन पुरुष दुहेरी खेळाडू मार्क लॅम्सफसने गुडघ्याच्या दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे, असे बॅडमिंटन जागतिक महासंघाने (BWF) सांगितले.  लैम्सफस आणि त्याचा साथीदार  मार्विन सेडेल चे भारताच्या सात्विकसाईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी आणि फ्रान्सचे लुकास कॉर्वे आणि रोनन लाबर (30 जुलै, 2024) यांच्या विरुद्ध C गटातील सामने यापुढे खेळवले जाणार नाहीत. 

Edited By- Priya Dixit