Paralympics:नितीश कुमारने बॅडमिंटनमध्ये सुवर्ण जिंकले, भारताला नववे पदक मिळाले
भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू नितीश कुमारने चमकदार कामगिरी करत सोमवारी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याने ब्रिटीश पॅरा बॅडमिंटनपटू डॅनियल बेथेलचा पुरुष एकेरीच्या SL3 प्रकारातील पदक सामन्यात 21-14, 18-21, 23-21 असा पराभव केला.
नितीशने या सामन्यातील पहिला गेम 21-14 असा जिंकला. तथापि, तो दुसऱ्या गेममध्ये मागे पडला आणि बेथेलने गेम 18-21 ने जिंकला. तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये अतिशय चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली आणि एका क्षणी स्कोअर 20-20 पर्यंत पोहोचला. मात्र, नितीशने 23-21 असा गेम जिंकून सुवर्णपदक जिंकले.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला मिळालेले हे 9 वे पदक आहे या मध्ये दोन सुवर्ण पदकांचा समावेश आहे. या पूर्वी अवनी लेखरा हिने नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावले आहे.
Edited by – Priya Dixit