पंतला 24 लाख रुपयांचा दंड

विशाखापट्टनम : 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील बुधवारी येथे खेळविण्यात आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघा विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला षटकांची गती राखता न आल्याने या संघाचा कर्णधार ऋषभ पंतला स्पर्धा आयोजकांनी नियमानुसार 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिल्ली संघाला निर्धारित वेळेत षटके पूर्ण करता आली नाहीत त्यामुळे आयपीएलच्या नियमावलीनुसार हा दंड करण्यात आला […]

पंतला 24 लाख रुपयांचा दंड

विशाखापट्टनम : 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील बुधवारी येथे खेळविण्यात आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघा विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला षटकांची गती राखता न आल्याने या संघाचा कर्णधार ऋषभ पंतला स्पर्धा आयोजकांनी नियमानुसार 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिल्ली संघाला निर्धारित वेळेत षटके पूर्ण करता आली नाहीत त्यामुळे आयपीएलच्या नियमावलीनुसार हा दंड करण्यात आला आहे. कर्णधार पंतला 24 लाख रुपयांचा दंड करण्यात आला असून, या संघातील इतर खेळाडूंना त्यांना मिळणाऱ्या मानधनातील 25 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावा लागणार आहे.