बबन भोबे मित्रमंडळातर्फे पाणपोईची सोय
बेळगाव : बबन भोबे मित्रमंडळातर्फे गोंधळी गल्ली, दत्त मंदिर येथे नागरिकांसाठी पाणपोईची सोय करण्यात आली आहे. डॉ. रुपा मुचंडी, शंकर पावशे यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शहरात येणाऱ्या नागरिकांना पाण्याची सोय व्हावी, यासाठी पाणपोई सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. गुरू मेडिकल यांच्यातर्फे पाण्याचा माठ देण्यात आला. सत्कार हॉटेलचे मालक किरण शानभा ग यांच्यातर्फे महाशिवरात्रीनिमित्त अन्नदान केले. कांतिलाल पोरवाल यांनी मंडळाला 1000 रुपयांची देणगी देऊन सहकार्य केले. यावेळी विजय मांगले, सुरेश शिंदे, शांता सुरेकर, दिलीप माने, बबन भोबे, अमित किल्लेकर, सुहास शिंदे आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी बबन भोबे मित्रमंडळातर्फे पाणपोईची सोय
बबन भोबे मित्रमंडळातर्फे पाणपोईची सोय
बेळगाव : बबन भोबे मित्रमंडळातर्फे गोंधळी गल्ली, दत्त मंदिर येथे नागरिकांसाठी पाणपोईची सोय करण्यात आली आहे. डॉ. रुपा मुचंडी, शंकर पावशे यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शहरात येणाऱ्या नागरिकांना पाण्याची सोय व्हावी, यासाठी पाणपोई सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. गुरू मेडिकल यांच्यातर्फे पाण्याचा माठ देण्यात आला. सत्कार हॉटेलचे मालक […]
