पन्नीरसेल्वम यांना वापरता येणार नाही पक्षचिन्ह
उच्च न्यायालयाने दिला निर्देश
वृत्तसंस्था/ चेन्नई
अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी झालेले नेते ओ. पन्नीरसेल्वम यांना पक्षाचे अधिकृत लेटरहेड, पक्षचिन्ह तसेच पक्षाचा ध्वज वापरता येणार नसल्याचे मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री तसेच अण्णाद्रमुकचे महासचिव ई. पलानिसामी यांच्याकडुन दाखल याचिकेवर न्यायाधीश एन. सतीशकुमार यांनी हा आदेश दिला आहे.
न्यायाधीश आर. महादेवन आणि मोहम्मद शफीक यांच्या खंडपीठाने 11 जानेवारी रोजी पन्नीरसेल्वम यांच्याकडून दाखल तीन याचिका फेटाळल्या होत्या. परंतु खंडपीठाने पन्नीरसेल्वम यांना स्वत:च्या विरोधात देण्यात आलेला आदेश रद्द करण्यासाठी आवश्क अर्ज दाखल करण्याची मुभा दिली होती. यानुसार पन्नीरसेल्वम यांनी याचिका दाखल केली होती. पलानिसामी आणि पन्नीरसेल्वम यांच्यात अण्णाद्रमुकच्या नेतृत्वावरून राजकीय संघर्ष झाला होता. जुलै 2022 मध्ये अण्णाद्रमुकच्या सर्वसाधारण सभेने पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संमत केला होता. तसेच पलानिसामी यांची पक्षाचे महासचिव म्हणून निवड करण्यात आली होती.
Home महत्वाची बातमी पन्नीरसेल्वम यांना वापरता येणार नाही पक्षचिन्ह
पन्नीरसेल्वम यांना वापरता येणार नाही पक्षचिन्ह
उच्च न्यायालयाने दिला निर्देश वृत्तसंस्था/ चेन्नई अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी झालेले नेते ओ. पन्नीरसेल्वम यांना पक्षाचे अधिकृत लेटरहेड, पक्षचिन्ह तसेच पक्षाचा ध्वज वापरता येणार नसल्याचे मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री तसेच अण्णाद्रमुकचे महासचिव ई. पलानिसामी यांच्याकडुन दाखल याचिकेवर न्यायाधीश एन. सतीशकुमार यांनी हा आदेश दिला आहे. न्यायाधीश आर. महादेवन आणि मोहम्मद शफीक यांच्या खंडपीठाने […]