आरोग्यवर्धक पनीर लाडू रेसिपी

साहित्य- पनीर – 300 ग्रॅम नारळाचा किस – 2 चमचे साखर – 1 कप वेलची पूड – 1/2 टीस्पून मिल्क पावडर – 1/2 टीस्पून

आरोग्यवर्धक पनीर लाडू रेसिपी

साहित्य- 

पनीर – 300 ग्रॅम

नारळाचा किस – 2 चमचे

साखर – 1 कप

वेलची पूड – 1/2 टीस्पून

मिल्क पावडर – 1/2 टीस्पून

मेवे – 2 चमचे 

तूप – 1/2 टीस्पून

 

कृती-

सर्वात आधी पनीर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. कढईत तूप गरम करून पनीर मध्यम आचेवर तळून घ्यावे आता त्यात साखर आणि वेलची पूड घालून पाच मिनिटे परतून घ्यावे. नंतर मिश्रण थोडं थंड करून त्यात नारळ पावडर आणि ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करावे. आता तयार मिश्रणाचे लाडू बनवा. तर चला तयार आहे आपले आरोग्यवर्धक पनीरचे लाडू रेसीपी, नक्कीच सर्व्ह करा. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik