बांदेश्वर-भूमिका मंदिरात १८ डिसेंबरपासून पंचायतन शुद्धीकरण विधी

प्रतिनिधी बांदा लोककल्याणसाठी तसेच रयतेच्या सुखी समृद्धीसाठी येथील श्री बांदेश्वर-भूमिका मंदिरात सोमवार दिनांक १८ व मंगळवार दिनांक १९ रोजी पंचायतन शुद्धीकरण विधीचे आयोजन करण्यात आले आहे.१८ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रायश्चित विधी, प्रधान संकल्प, गणपतीपूजन, पुण्यहवचन, नांदाश्राद्ध, संभारदान, प्राकारशुद्धी, श्री बांदेश्वर चरणी लघुरुद्र, श्री देवी भूमिका चरणी महापूजा, पंचायतन देवताना अभिषेक, पूजा, […]

बांदेश्वर-भूमिका मंदिरात १८ डिसेंबरपासून पंचायतन शुद्धीकरण विधी

प्रतिनिधी
बांदा
लोककल्याणसाठी तसेच रयतेच्या सुखी समृद्धीसाठी येथील श्री बांदेश्वर-भूमिका मंदिरात सोमवार दिनांक १८ व मंगळवार दिनांक १९ रोजी पंचायतन शुद्धीकरण विधीचे आयोजन करण्यात आले आहे.१८ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रायश्चित विधी, प्रधान संकल्प, गणपतीपूजन, पुण्यहवचन, नांदाश्राद्ध, संभारदान, प्राकारशुद्धी, श्री बांदेश्वर चरणी लघुरुद्र, श्री देवी भूमिका चरणी महापूजा, पंचायतन देवताना अभिषेक, पूजा, देवता स्थापन, नवचंडी जप, आरती, तीर्थप्रसाद कार्यक्रम होणार आहेत.
१९ रोजी सकाळी ८ ते १२.३० वाजेपर्यंत आवाहित देवता पूजन, चंडीहोम, दुर्गाहोम, पंचायतन योग, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक सांगता कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी १ वाजता आरती, नैवेद्य व महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केले आहे.

Go to Source