पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

Kids story : एका घनदाट जंगलामध्ये मदोत्कट नावाचा एक सिंह राहायचा. वाघ, कावळा आणि कोल्हा हे तीन त्याचे सेवेकरी होते. एकदा त्यांनी एका उंटाला पाहिले जो त्याच्या कळपापासून भटकला होता. उंटाला पाहून सिंह म्हणू लागला की,हा कोणता प्राणी आहे जाऊन तपास करून …

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

Kids story : एका घनदाट जंगलामध्ये मदोत्कट नावाचा एक सिंह राहायचा. वाघ, कावळा आणि कोल्हा हे तीन त्याचे सेवेकरी होते. एकदा त्यांनी एका उंटाला पाहिले जो त्याच्या कळपापासून भटकला होता. उंटाला पाहून सिंह म्हणू लागला की,हा कोणता प्राणी आहे जाऊन तपास करून या. यावर कावळा म्हणाला की, महाराज हा उंट आहे. तुम्ही याची शिकार करू शकतात. 

 

सिंह म्हणाला की, आपल्या इथे आलेल्या अतिथीला मी मारत नाही. त्याला माझ्याजवळ घेऊन या मी त्याला इथे येण्यामागचे कारण विचारेल. कावळा उंटाजवळ गेला व त्याला आदराने सिंहाजवळ घेऊन आला.उंटाने सिंहाला प्रणाम केला व खाली बसला.सिंहाने त्याला जंगलात येण्यामागचे कारण विचारले तर त्याने सांगितले की, मी रस्ता भटकलो आहे. सिंहाने त्याला राहण्यासाठी आग्रह धरला व आता उंट सिंहाजवळ राहू लागला. 

 

काही दिवसानंतर सिंहाचे एका जंगली हत्तीसोबत युद्ध झाले. हत्तीच्या दातांनी सिहाला पार जखमी केले. तो खूप अशक्त झाला. सिंह जखमी झाला त्यामुळे कावळा आणि इतर सेवेकरी आता भूकेने व्याकुळ होऊ लागले. कारण जेव्हा सिंह शिकार करायचा तेव्हा या सर्वांना जेवण मिळायचे. आता सिंह सर्वांना म्हणाला की, असा शिकार शोधून आणा की मी या अवस्थेत त्याला ठार करू शकेल व तुम्हाला जेवण मिळेल. आता सर्वीकडे फिरल्यावर त्यांना काहीच मिळाले नाही. आता यावर कोल्हा म्हणाला की, आपण उंटाला मारू या म्हणजे आपल्याला अनेक दिवस त्याचे मांस खाता येईल. आता कोल्हा सिंहाला म्हणाला की, आपण उंटाला मारू या व आपली भूक मिटवू या. यावर सिंह नाही म्हणाला, कारण उंट त्याचा अतिथी होता. 

 

आता कोल्ह्याने सिंहाला कसे बसे तयार केले. सर्वजण सिंहाजवळ आले उंट देखील आला. आता सिंह सर्वांना म्हणाला की, तुम्हाला काही मिळाले का? सर्वानी सांगितले की, काही मिळाले नाही. आता सर्व जण एकेक करून सिंहाजवळ उभे राहिले व आम्हाला ठार करा आमची शिकार करून भूक मिटवा अशी विनंती करू लागले. पण सिंहाने काहीतरी सांगून सर्वांना ठार करणे टाळलं. आता उंटाची वेळ आली . सर्व म्हणत आहे म्हणून उंट देखील म्हणाला की, महाराज मला ठार करा व आपली भूक मिटवा. आता उंटाने हे बोलताच वाघ आणि कोल्हा उंटावर तुटून पडले व त्याला ठार केले. व सर्वानी उंटाच्या मांसावर यथेच्छ ताव मारला. बिचारा उंट सर्वानी त्याच्या विरोधात केलेले षडयंत्र समजू शकाला नाही. व आपल्या प्राणांना मुकला. 

तात्पर्य : कधीही कोणावर अति विश्वास करू नये. 

Edited By- Dhanashri Naik