पंचतंत्र : शेळ्या आणि कोल्ह्याची गोष्ट

एकदा एक कोल्हा एक गावातून जात होता. त्याने गावाजवळच्या बाजारात लोकांची गर्दी जमलेली पाहिली. कुतूहल म्हणून कोल्हा काय झाले हे पाहण्यासाठी त्या गर्दीजवळ गेला. कोल्ह्याने पाहिले की, दोन शेळ्या एकमेकांशी भांडत होत्या. दोन्ही शेळ्या खूप मजबूत होत्या, …

पंचतंत्र : शेळ्या आणि कोल्ह्याची गोष्ट

एकदा एक कोल्हा एक गावातून जात होता. त्याने गावाजवळच्या बाजारात लोकांची गर्दी जमलेली पाहिली. कुतूहल म्हणून कोल्हा काय झाले हे पाहण्यासाठी त्या गर्दीजवळ गेला. कोल्ह्याने पाहिले की, दोन शेळ्या एकमेकांशी भांडत होत्या. दोन्ही शेळ्या खूप मजबूत होत्या, त्यामुळे त्यांच्यात जोरदार भांडण झाले होते. सर्व लोक मोठ्याने ओरडून टाळ्या वाजवत होते. दोन्ही शेळ्या मोठ्या प्रमाणात रक्तबंबाळ झाल्या होत्या आणि रक्तही रस्त्यावर वाहत होते.

 

इतकं ताजं रक्त पाहून कोल्ह्याला स्वतःवर नियंत्रण राहिले नाही. त्याला फक्त त्या ताज्या रक्ताचा आस्वाद घ्यायचा होता आणि शेळ्यांचा फडशा पडायचा होता. कोल्ह्याने त्यांच्यावर झेप घेतली. पण कोल्ह्याला लक्षात आले नाही की, दोन्ही शेळ्या खूप मजबूत होत्या. शेळ्यांची कोल्ह्याला मारहाण केल्याने कोल्हा जागीच मरण पावला.

तात्पर्य : अति लोभ हा संकटाचे दरवाजे उघडत असतो. 

Edited By- Dhanashri Naik