पंचतंत्र कहाणी : एक तहानलेला कावळा

अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट जंगलात एक कावळा राहायचा. तसे तर जंगल खूप सुंदर आणि हिरवेगार होते. सर्व पशुपक्षी तिथे आनंदात राहत होते. तसेच हा कावळा देखील खूप आनंदात राहत होता. पण एकदा काय झाले एका वर्षी पाऊसच पडला नाही त्यामुळे त्या जंगलात …

पंचतंत्र कहाणी : एक तहानलेला कावळा

अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट जंगलात एक कावळा राहायचा. तसे तर जंगल खूप सुंदर आणि हिरवेगार होते. सर्व पशुपक्षी तिथे आनंदात राहत होते. तसेच हा कावळा देखील खूप आनंदात राहत होता. 

 

पण एकदा काय झाले एका वर्षी पाऊसच पडला नाही त्यामुळे त्या जंगलात कोरडा दुष्काळ पडला व झाडे, तलाव , सरोवर सर्व अगदीच वळून गेले. सर्व पशु पक्षी जंगल सोडून जाऊ लागले. तसेच कावळा देखील जंगल सोडून जायला लागला. तर वाटेत कावळ्याला तहान लागली. तो इकडे तिकडे पाहू लागला कुठे पाणी मिळते आहे का असे. उडत उडत तो एका गावाजवळ येऊन पोहचला. त्याला तिथे एक रांजण दिसला त्याला खूप आनंद झाला तो जाऊन त्या पाण्याच्या रांजण वर बसला. त्याने आत वाकून पाहिले तर त्याला आतमध्ये अगदीच तळाशी पाणी दिसले. आता काय करावे कावळ्याला सुचेना, तसेच तहानलेला बिचारा कावळा विचार करू लागला. कावळ्याला एक युक्ती सुचली रांजण जवळ पडलेले खडे त्याने चोचीमध्ये धरून पाण्यात टाकायला सुरवात असे करता करता पाणी वर आले व खडे खाली तळाशी गेले. कावळ्याला मोठा आनंद झाला. तहानलेल्या कावळ्याने पोटभर पाणी पिले. व तिथून उडून गेला. 

 

तात्पर्य : शांत बुद्धीने अनेक कठीण समस्यांवर मार्ग निघतात. 

Edited By- Dhanashri Naik