चीनमध्ये आता ‘पाम पेमेंट’ तंत्रज्ञान
ऑनलाइन पेमेंट पद्धतीवरून तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. चीनने अलिकडेच लाँच झालेले नवे पेमेंट तंत्रज्ञान पाहून लोक अचंबित झाले आहेत. अलिकडेच आरपीजी ग्रूपचे प्रमुख हर्ष गोयंका यांनी सोशल मीडियावर एक इनोवेटिव्ह व्हिडिओ शेअर केला असून यात चीनमधील नवी पेमेंट पद्धत ‘पाम पेमेंट’विषयी सांगण्यात आले आहे. ही क्लिप इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असून लोकांना पेमेंटची ही नवी आणि सोपी पद्धत अत्यंत पसंत पडत आहे. या व्हिडिओत बीजिंग मेट्रो येथे पाम पेमेंटचा वापर करताना पाहिले जाऊ शकते. चीनमध्ये असताना मला क्यूआर कोड आणि फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करून पॅशलेस पेमेंट करण्याची सवय आहे परंतु आता येथे तळहाताद्वारे देखील पेमेंट करू शकते असे ही महिला म्हणत असल्याचे या व्हिडिओत दिसून येते. चीनची तंत्रज्ञान कंपनी वुईचॅटने पाम पेमेंट तंत्रज्ञान सादर केले आहे. पाम पेमेंटमध्ये स्वत:च्या तळहाताला एका उपकरणावर स्कॅन करून प्रिंट रजिस्टर्ड केला जातो आणि याला स्वत:च्या पेमेंट माहितीशी लिंक केले जाते. स्कॅनरवर स्वत:चा हात ठेवल्यावर व्हीचॅट अकौंटद्वारे ऑटोमॅटिक पेमेंट प्रक्रिया पार पडते. या पाम पेमेंट तंत्रज्ञानाचा वापर सध्या केवळ वाहतुकीसाठी केला जात आहे, परंतु आगामी काळात दुकान, रेस्टॉरंट आणि अन्य ऑनलाइन पेमेंट प्रक्रियेतही याचा वापर केला जाणार आहे. पाम पेमेंटचा वापर आता जगभरात होणार असल्याचे मानले जात आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 28 हजारांहून अधिक ह्यूज मिळाल्या. तर लोकांनी कॉमेंट करत डाटा सुरक्षेच्या मुद्द्यावर संशय व्यक्त केला आहे. या तंत्रज्ञानात डाटा एक्सचेंजची जोखीम मोठी असू शकते असे युजरने नमूद केले आहे.
Home महत्वाची बातमी चीनमध्ये आता ‘पाम पेमेंट’ तंत्रज्ञान
चीनमध्ये आता ‘पाम पेमेंट’ तंत्रज्ञान
ऑनलाइन पेमेंट पद्धतीवरून तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. चीनने अलिकडेच लाँच झालेले नवे पेमेंट तंत्रज्ञान पाहून लोक अचंबित झाले आहेत. अलिकडेच आरपीजी ग्रूपचे प्रमुख हर्ष गोयंका यांनी सोशल मीडियावर एक इनोवेटिव्ह व्हिडिओ शेअर केला असून यात चीनमधील नवी पेमेंट पद्धत ‘पाम पेमेंट’विषयी सांगण्यात आले आहे. ही क्लिप इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असून लोकांना पेमेंटची ही […]