पल्लवी श्रीनिवास धेंपे यांची मालमत्ता 257 कोटींची

पणजी : लोकसभेच्या दक्षिण गोवा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांच्याकडे सुमारे 257 कोटींची मालमत्ता असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. पती श्रीनिवास धेंपे यांच्याकडे 994 कोटीची मालमत्ता असल्याची माहिती स्पष्ट झाली आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना मालमत्तेचा तपशील प्रतिज्ञापत्रातून द्यावा लागतो तसेच देणी किती आहेत याची माहिती कळवावी लागते. प्रतिज्ञापत्रातील […]

पल्लवी श्रीनिवास धेंपे यांची मालमत्ता 257 कोटींची

पणजी : लोकसभेच्या दक्षिण गोवा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांच्याकडे सुमारे 257 कोटींची मालमत्ता असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. पती श्रीनिवास धेंपे यांच्याकडे 994 कोटीची मालमत्ता असल्याची माहिती स्पष्ट झाली आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना मालमत्तेचा तपशील प्रतिज्ञापत्रातून द्यावा लागतो तसेच देणी किती आहेत याची माहिती कळवावी लागते. प्रतिज्ञापत्रातील तपशीलानुसार पल्लवी यांच्या बँक खात्यात ऊ. 9.91 कोटी इतकी रक्कम असून ऊ. 12.92 कोटीची बचत त्यांनी केलेली आहे. शिवाय ऊ. 217 कोटीचे बाँड त्यांच्या नावे आहेत. त्यांच्याकडे असलेल्या वाहनांची रक्कम 2.54 कोटी एवढी असून ऊ. 5.59 कोटीचे सोने असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तसेच 9.75 कोटीची इतर मालमत्ता असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रातून दिली आहे. वरील सर्व तपशील धऊन 257.71 कोटीची एकूण मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रातून दिसून आले आहे.