पालघर: दुहेरी मतदारांना मतदान केंद्र निवडण्याची मुभा
वसई-विरार महानगरपालिका (VVMC) क्षेत्रातील दुहेरी मतदारांना (डबल वोटर्स) फॉर्म भरून आपले पसंतीचे मतदान केंद्र निवडण्याची मुभा दिली आहे. मात्र, या निर्णयाविरोधात बहुजन विकास आघाडी (बीव्हीए) आक्रमक झाली आहे. त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी 22 डिसेंबर रोजी होणार आहे.पाच वर्षांनंतर वसई–विरार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. महापालिका क्षेत्रात एकूण 29 प्रभाग आहेत. यापैकी 28 प्रभागांतून प्रत्येकी 4 नगरसेवक आणि 29व्या प्रभागातून 3 नगरसेवक निवडले जाणार आहेत. एकूण 115 जागांसाठी निवडणूक होणार आहे. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असून, महापालिका प्रशासनाकडूनही मोठ्या प्रमाणावर नियोजन सुरू आहे.दरम्यान, VVMCने नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये एकूण 11,27,640 मतदारांची नोंद आहे. ही यादी 1 जुलै 2025 पर्यंत वैध असलेल्या विधानसभा मतदार यादीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. मात्र, या प्रकाशित यादीत सुमारे 52,378 नावे दुहेरी (डबल एन्ट्री) असल्याचे उघड झाले आहे.राजकीय पक्षांनी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तपासल्यानंतर मोठ्या प्रमाणावर दुहेरी नावे असल्याचे निदर्शनास आणले. बहुजन विकास आघाडीने तब्बल 80,00 दुहेरी नावांवर आक्षेप नोंदवून ती रद्द करण्याची मागणी केली आहे. दुहेरी मतदारांच्या प्रश्नामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.हा पेच सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाने दुहेरी नावे असलेल्या मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार VVMCने आपल्या संकेतस्थळावर 50,000 दुहेरी मतदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. संबंधित मतदारांनी आपली नावे तपासून ज्या एका मतदान केंद्रावर मतदान करायचे आहे, ते निवडण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.तरीही, या मुद्द्यावर बहुजन विकास आघाडी अधिक आक्रमक झाली आहे. बीव्हीएचे प्रवक्ते अजीव पाटील यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 22 डिसेंबर 2025 रोजी सुनावणी होणार आहे.पाटील यांनी सांगितले, “फक्त हमीपत्र (अंडरटेकिंग फॉर्म) घेण्याऐवजी दुहेरी नावे थेट रद्द करणे आवश्यक आहे. एका प्रभागात मोठ्या प्रमाणावर दुहेरी नावे असल्याने या मतांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
Home महत्वाची बातमी पालघर: दुहेरी मतदारांना मतदान केंद्र निवडण्याची मुभा
पालघर: दुहेरी मतदारांना मतदान केंद्र निवडण्याची मुभा
वसई-विरार महानगरपालिका (VVMC) क्षेत्रातील दुहेरी मतदारांना (डबल वोटर्स) फॉर्म भरून आपले पसंतीचे मतदान केंद्र निवडण्याची मुभा दिली आहे. मात्र, या निर्णयाविरोधात बहुजन विकास आघाडी (बीव्हीए) आक्रमक झाली आहे. त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी 22 डिसेंबर रोजी होणार आहे.
पाच वर्षांनंतर वसई–विरार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. महापालिका क्षेत्रात एकूण 29 प्रभाग आहेत. यापैकी 28 प्रभागांतून प्रत्येकी 4 नगरसेवक आणि 29व्या प्रभागातून 3 नगरसेवक निवडले जाणार आहेत. एकूण 115 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असून, महापालिका प्रशासनाकडूनही मोठ्या प्रमाणावर नियोजन सुरू आहे.
दरम्यान, VVMCने नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये एकूण 11,27,640 मतदारांची नोंद आहे. ही यादी 1 जुलै 2025 पर्यंत वैध असलेल्या विधानसभा मतदार यादीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. मात्र, या प्रकाशित यादीत सुमारे 52,378 नावे दुहेरी (डबल एन्ट्री) असल्याचे उघड झाले आहे.
राजकीय पक्षांनी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तपासल्यानंतर मोठ्या प्रमाणावर दुहेरी नावे असल्याचे निदर्शनास आणले. बहुजन विकास आघाडीने तब्बल 80,00 दुहेरी नावांवर आक्षेप नोंदवून ती रद्द करण्याची मागणी केली आहे. दुहेरी मतदारांच्या प्रश्नामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.
हा पेच सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाने दुहेरी नावे असलेल्या मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार VVMCने आपल्या संकेतस्थळावर 50,000 दुहेरी मतदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. संबंधित मतदारांनी आपली नावे तपासून ज्या एका मतदान केंद्रावर मतदान करायचे आहे, ते निवडण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
तरीही, या मुद्द्यावर बहुजन विकास आघाडी अधिक आक्रमक झाली आहे. बीव्हीएचे प्रवक्ते अजीव पाटील यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 22 डिसेंबर 2025 रोजी सुनावणी होणार आहे.
पाटील यांनी सांगितले, “फक्त हमीपत्र (अंडरटेकिंग फॉर्म) घेण्याऐवजी दुहेरी नावे थेट रद्द करणे आवश्यक आहे. एका प्रभागात मोठ्या प्रमाणावर दुहेरी नावे असल्याने या मतांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
