भारतीय मच्छिमारांच्या विरोधात पाकिस्तानची कारवाई
7 मच्छिमारांनी भरलेली नौका बुडाली
वृत्तसंस्था/ पोरबंदर
पाकिस्तानने भारतीय मच्छिमारांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. 21 मार्च रोजी भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या सागरी क्षेत्रात मासेमारी करत होते असा दावा करण्यात आला होता. पाकिस्तानच्या समुद्र सुरक्षेशी निगडित यंत्रणा पीएमएसएने भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान 2 मच्छिमार बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कुठल्याही देशाचा एक्सक्लुझिव्ह इकोनॉमिक झोन सर्वसाधारणपणे 200 सागरी मैलापर्यंत फैलावलेला असतो. ईईझेडमध्ये असलेल्या नैसर्गिक संपदेवर संबंधित देशाचा अधिकार असतो. भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या सागरी क्षेत्रात मासेमारी करत असल्याचा आरोप आहे. पीएमएसएची नौका पाहता या मच्छिमारांनी तेथून पळण्याचा प्रयत्न केला, यादरम्यान नौका अन् पीएमएसएच्या नौकेची टक्कर झाली आहे. यावेळी 7 पैकी 5 मच्छिमारांना आणि 4 पीएमएसएच्या खलाशांना वाचविण्यात आले. तर 2 मच्छिमार बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
Home महत्वाची बातमी भारतीय मच्छिमारांच्या विरोधात पाकिस्तानची कारवाई
भारतीय मच्छिमारांच्या विरोधात पाकिस्तानची कारवाई
7 मच्छिमारांनी भरलेली नौका बुडाली वृत्तसंस्था/ पोरबंदर पाकिस्तानने भारतीय मच्छिमारांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. 21 मार्च रोजी भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या सागरी क्षेत्रात मासेमारी करत होते असा दावा करण्यात आला होता. पाकिस्तानच्या समुद्र सुरक्षेशी निगडित यंत्रणा पीएमएसएने भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान 2 मच्छिमार बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. कुठल्याही देशाचा […]
