पाकव्याप्त काश्मीर आमचेच!

पाकव्याप्त काश्मीर आमचेच असून ते मिळविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी व्यक्त केला आहे. राजनाथसिंग लखनौ मतदारसंघातून निवडणुकीच्या स्पर्धेत असून त्यांना यंदा हॅटट्रिकची अपेक्षा आहे. त्यांनी शनिवारी या मतदारसंघातील प्रचार सभेत काँग्रेसवर हल्ला चढविला. गेल्या दहा वर्षांमध्ये आमच्या सरकारने देशाची संरक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणात भक्कम केली. सीमेवरील जे भाग आजवर दुर्लक्षित […]

पाकव्याप्त काश्मीर आमचेच!

पाकव्याप्त काश्मीर आमचेच असून ते मिळविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी व्यक्त केला आहे. राजनाथसिंग लखनौ मतदारसंघातून निवडणुकीच्या स्पर्धेत असून त्यांना यंदा हॅटट्रिकची अपेक्षा आहे. त्यांनी शनिवारी या मतदारसंघातील प्रचार सभेत काँग्रेसवर हल्ला चढविला.
गेल्या दहा वर्षांमध्ये आमच्या सरकारने देशाची संरक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणात भक्कम केली. सीमेवरील जे भाग आजवर दुर्लक्षित होते, तेथे आम्ही लक्ष दिले. मोठ्या प्रमाणात सीमावर्ती भागांमध्ये मार्गनिर्मिती केल्याने सैन्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. भारताचा कोणताही भाग शत्रूच्या हाती पडू नये म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या गेल्या 10 वर्षांमधील धोरणांमुळे आज देशाची मान आंतरराष्ट्रीय क्षेत्रात उंचावली असून भारताचे मूल्य वाढले आहे, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले.
बलियामध्येही सभा
राजनाथसिंग यांनी उत्तर प्रदेशातील बलिया मतदारसंघातही त्यांनी प्रचारसभा घेतली. भारतीय जनता पक्षाचे सालेमपूर थेथील उमेदवार रविंद्र कुशवाह यांच्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील सर्व 80 जागा जिंकण्याचा निर्धार त्यांनी या प्रचारसभेत पुन्हा एकदा व्यक्त केला.
आदित्यनाथांचेही भाषण
या दोन्ही मतदारसंघांमध्ये त्यांच्यासह व्यासपीठावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही होते. त्यांनीही दोन्ही सभांमध्ये भाषणे केली. उत्तर प्रदेशातील माफिया राज आमच्या पक्षाने संपुष्टात आणले. आता या राज्यात सर्वसामान्य जनता नव्हे, तर गुंड आणि दुष्ट शक्ती घाबरलेल्या आहेत. यामुळे या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रचंड यश मिळेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.