PAK vs BAN: बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव सहा गडी राखून केला,इतिहास रचला

बांगलादेशने सलग दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा बांगलादेशने धुव्वा उडवला. पहिली कसोटी बांगलादेश ने 10 गडी राखून जिंकली. हे सामने रावळपिंडीत झाले.

कसोटी सामना गमावल्यानंतर पाकिस्तान संघ आणि खेळाडू धोक्यात आले आहे. प्रथमच बांगलादेशने पाकिस्तानला धूळ चारली आहे. 

बांगलादेशचे कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या डावात 274 धावा केल्या.तर बांगलादेशचा डाव 262 वर संपला.पहिल्या डावाच्या जोरावर पाकिस्तान ने दुसऱ्या डावात आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात पाकिस्तानने 172 धावा करत बांग्लादेश समोर 185 धावांचे लक्ष ठेवले. बांग्लादेश ने हे लक्ष केवळ चार गडी गमावून पूर्ण केले. या सामन्याचा हिरो लिटनदास ठरला. 

Edited by – Priya Dixit 

Go to Source