पाक-न्यूझीलंड टी-20 मालिका कार्यक्रम जाहीर
इस्लामाबाद
येत्या जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी पाकिस्तान क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका मायदेशात खेळणार असून या मालिकेचा कार्यक्रम पीसीबीने बुधवारी जाहीर केला. या मालिकेत पाच टी-20 सामने खेळविले जाणार आहेत.
न्यूझीलंड संघ या मालिकेसाठी 14 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये दाखल होणार आहे. या मालिकेतील पहिले तीन सामने रावळपिंडीत 18, 20, 21 एप्रिल रोजी खेळविले जातील. शेवटचे दोन सामने लाहोरमध्ये 25 व 27 एप्रिल रोजी हातील. पीसीबीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संचालक यांनी या मालिकेबद्दल आशावाद व्यक्त केला. ही मालिका टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल, त्यात चुरस पहावयास मिळेल, अशी अपेक्षा आहे, असे पीसीबीने म्हटले आहे.
विश्वचषक स्पर्धेसाठी पाक संघ आयर्लंडविरुद्ध दोन तर इंग्लंडविरुद्ध चार टी-20 सामने खेळणार आहे. येत्या मे महिन्यात या मालिका आयर्लंड व इंग्लंडमध्ये होतील. या दौऱ्यानंतर पाक संघ तेथूनच वर्ल्ड कपसाठी विंडीज-अमेरिकेला थेट प्रयाण करणार आहे. पाकमध्ये येणाऱ्या न्यूझीलंड संघाला मात्र काही प्रमुख खेळाडूंची उणीव जाणवेल. त्यात केन विल्यम्सन, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र, डॅरील मिचेल, ट्रेंट बोल्ट, देव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, लॉकी फर्ग्युसन यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू भारतातील आयपीएलमध्ये सामील होणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी पाक संघ लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे पीसीबीने सांगितले.
Home महत्वाची बातमी पाक-न्यूझीलंड टी-20 मालिका कार्यक्रम जाहीर
पाक-न्यूझीलंड टी-20 मालिका कार्यक्रम जाहीर
इस्लामाबाद येत्या जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी पाकिस्तान क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका मायदेशात खेळणार असून या मालिकेचा कार्यक्रम पीसीबीने बुधवारी जाहीर केला. या मालिकेत पाच टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. न्यूझीलंड संघ या मालिकेसाठी 14 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये दाखल होणार आहे. या मालिकेतील पहिले तीन सामने रावळपिंडीत 18, 20, 21 एप्रिल रोजी खेळविले जातील. […]
